-
मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत, यामुळे स्त्रियांमध्ये शारीरिक आणि भावनिक बदल दिसून येतात. त्यामुळे या दरम्यान महिलांनी जीवनशैली संतुलित ठेवण्यासाठी काळजी घेणे गरजेच आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरने तीन खाद्यपदार्थांची (actual foods) शिफारस केली आहे, जी मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजमधून जात असणाऱ्या महिलांसाठी पोषक तत्वे प्रदान करतात. (फोटो सौजन्य: @इन्स्टाग्राम / @rujuta.diwekar)
-
मेनोपॉझल आणि पेरीमेनोपॉझलमधून जात असणाऱ्या महिलांना त्यांच्या आहारात निरोगी चरबी, कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर समाविष्ट करण्यासाठी तिने तीन प्रॅक्टिकल स्ट्रॅटजी सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांचा या टिप्स शेअर करण्या मागचा उद्देश मानसिक शांतता वाढवून जीवनाच्या या टप्प्याशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी आहे. तर हे तीन पदार्थ नक्की कोणते आहेत चला पाहू… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नाश्ता टाळू नका (Never skip breakfast) – सर्वप्रथम, रुजुताने रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉझल) आणि पेरीमेनोपॉझल काळात असणाऱ्या महिलांना संतुलित नाश्ता खाण्याचा सल्ला दिला आहे. जेवण न टाळता, मिक्सरचा वापर न करता कढईत किंवा तव्यावर साधे जेवण तयार करावे. असे सांगून ती पुढे हिंदीत म्हणाली की, ‘तुम्हाला माहिती आहे तो नाश्ता कोणता आहे. माझ्याकडे बघू नका; तुमच्या स्वयंपाकघरात बघा. तुम्हाला काय खायचे आहे ते तुम्हाला समजेल’. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नट्सचे सेवन करा – रुजुताने शिफारस केलेला दुसरा खाद्यपदार्थ म्हणजे शेंगदाणे . तुमचा चेहरा, केस, पोट आणि एकूण आरोग्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आहारतज्ज्ञांनी तुमच्या चहा किंवा कॉफीबरोबर मूठभर शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याव्यतिरिक्त, शेंगदाणे खाल्ल्याने तुमची चिडचिड कमी करेल, जे रजोनिवृत्तीचे सहसा लक्षण दिसून येते. जीवनात गोडवा आणण्यासाठी काहीतरी कुरकुरीत हवे असते, ज्यामुळे तुमचे पोट आणि मेंदूला ताजे अन्न मिळू शकेल,यासाठी नट्सचे सेवन करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
रात्री शेंगाबरोबर भात खा – शेवटी, रुजुताने रात्री चांगली झोप येण्यासाठी रात्रीच्या जेवणात भात खाण्याचा सल्ला दिला. तिने तांदूळ शेंगा (जसे की मूग, लोबिया (lobia), चणे आणि घरी बनवलेले ताक पिण्याचा सुद्धा सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
यामुळे रजोनिवृत्तीच्या महिलांना त्यांच्या गॅसच्या समस्या आणि रात्रीच्या वेळी हॉट फ्लॅशेसना सामोरे जाण्यास मदत करेल.हॉट फ्लॅशेस म्हणजे अचानकच छातीत, चेहर्यावर किंवा मानेच्या भागात गरम झळा आल्यासारखं वाटणं. (फोटो सौजन्य: @Freepik)

‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल