-
शेंगदाणे हे पौष्टिकतेचा एक प्रमुख स्रोत आहेत, पण शेंगदाणे खाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? शेंगदाणे सालीसह खावेत की, त्याची साल काढून खावे; या गोष्टीचा विचार करण्यापूर्वी आपण शेंगदाणे का खावेत हे समजून घेऊया. शेंगदाणे हे ऊर्जेचे केंद्र आहेत आणि यामध्ये शरीराला सतत ऊर्जा, स्नायूंची दुरुस्ती आणि एकूणच आरोग्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक असतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“फायबर, प्रथिने आणि मेदयुक्त असलेले शेंगदाणे जेवणानंतर तुम्हाला उत्साही राखण्यास मदत करतात. ते फोलेट आणि मॅग्नेशियमसारख्या आवश्यक खनिजांचा उत्कृष्ट डोसदेखील प्रदान करतात,” असे पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधील जनरल मेडिसिनचे सल्लागार डॉ. विनीत राव सांगतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
शेंगदाण्याच्या लाल सालीत भरपूर प्रमाणात खनिजे आणि जैविकदृष्ट्या सक्रिय पदार्थ असतात, जे आरोग्यास लक्षणीयरीत्या सुधारू शकतात, तरीही ते वारंवार टाकून दिले जातात. डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून, पातळ लालसर-तपकिरी सालीसह शेंगदाणे खाणे अधिक फायदेशीर आहे.
(फोटो सौजन्य: Freepik) -
शेंगदाण्याच्या लाल सालीत भरपूर प्रमाणात खनिजे आणि जैविकदृष्ट्या सक्रिय पदार्थ असतात, जे आरोग्यास लक्षणीयरीत्या सुधारू शकतात, तरीही ते वारंवार टाकून दिले जातात. डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून, पातळ लालसर-तपकिरी सालीसह शेंगदाणे खाणे अधिक फायदेशीर आहे.
(फोटो सौजन्य: Freepik) -
शेंगदाण्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, विशेषतः रेझवेराट्रोल आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे पॉलीफेनॉल, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. “जेव्हा मुक्त रॅडिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्समधील असंतुलीत पेशींना नुकसान पोहोचवते, वृद्धत्व आणि इतर विकारांना कारणीभूत ठरू शकते, तेव्हा ऑक्सिडेटिव्ह ताण येतो. (फोटो सौजन्य: Freepik) -
शेंगदाण्याच्या सालीमध्ये पचनसंस्था निरोगी राखण्यासाठी आवश्यक असलेले फायबर असते. “निरोगी आतड्यांतील बॅक्टेरियाच्या वाढीस फायबर मदत करते, जे सामान्य आतड्यांचे आरोग्य आणि नियमित आतड्यांच्या हालचालींसाठी आवश्यक आहे. फायबरयुक्त आहार बद्धकोष्ठता आणि डायव्हर्टिकुलोसिससह पचनविषयक आजारांचा धोका कमी करण्यास आणि कोलन कर्करोग होण्याची शक्यता कमी करण्यासदेखील मदत करू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
फायबर आणि पॉलीफेनॉल घटकांमुळे, शेंगदाण्याची साल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना फायदेशीर ठरू शकते. “फायबरमुळे पचनक्रिया मंदावते, परिणामी रक्ताभिसरणात ग्लुकोज अधिक स्थिरपणे सोडले जाते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी करण्यास मदत होते,” असे डॉ. राव म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
काही व्यक्तींना त्याची साल थोडीशी कडू किंवा पचण्यास कठीण वाटू शकते. “क्वचित प्रसंगी शेंगदाण्याच्या सालीमुळे ॲलर्जी किंवा जठरांत्रीय अस्वस्थता निर्माण होऊ शकते. जर तुमचे पोट संवेदनशील असेल किंवा तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल, तर त्यांना सोलून खाणे हा एक सुरक्षित पर्याय असू शकतो. याव्यतिरिक्त, भाजलेले शेंगदाणे साल नसलेल्या शेंगदाण्यांपेक्षा जास्त पोषक तत्वे टिकवून ठेवतात,” असे डॉ. बिराली म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जास्तीत जास्त फायद्यांसाठी मीठ न लावलेले, भाजलेले शेंगदाणे निवडा आणि त्यांची साल पूर्णपणे स्वच्छ ठेवा. “अशा प्रकारे तुम्हाला फायबर, आवश्यक चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जे पचन सुधारण्यास आणि एकूणच आरोग्यास हातभार लावतात,” असे डॉ. बिराली म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कोणत्याही अन्नाप्रमाणे संयम महत्त्वाचा आहे. “शेंगदाण्यांचे जास्त सेवन केल्याने कॅलरीज जास्त प्रमाणात वाढू शकतात आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात,” असे डॉ. बिराली म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
![Chhaava Box Office Collection Day 1](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Chhaava-Box-Office-Collection-Day-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Chhaava : ‘छावा’ची ग्रँड ओपनिंग! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी