-
हृदयासंबंधीत आजार हा जगभरातील प्रमुख समस्यांपैकी एक आहे. परंतु, या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेहमीच जीवनशैलीत कठोर बदल करणे आवश्यक आहे, असे नाही. दैनंदिन सवयींमध्ये लहान-लहान गोष्टींद्वारे सातत्यपूर्ण बदल केल्यानेदेखील कालांतराने हृदयाच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अनेक जण हृदय निरोगी ठेवण्यासाठी आयुष्यात मोठमोठे बदल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, लहान आणि दैनंदिन निवडी बहुतेकदा जास्त फायदेशीर ठरू शकतात. पण, हे छोटे असले तरी प्रभावी बदल कोणते आहेत आणि ते दीर्घकालीन हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी कसे योगदान देतात? (फोटो सौजन्य: Freepik)
-
साध्या जीवनशैलीतील बदलांचा हृदयाच्या आरोग्यावर कायमस्वरूपी परिणाम कसा होऊ शकतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंच्धीया आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत कशी होते हे समजून घेण्यासाठी इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीचे सरचिटणीस डॉ. सी. एम. नागेश यांच्याशी बातचीत केली. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. नागेश म्हणतात, “हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कमीत कमी ३० मिनिटे मध्यम व्यायाम करा; जसे की चालणे, सायकलिंग किंवा पोहणे. नियमित शारीरिक हालचाली रक्तदाब कमी करण्यास, रक्ताभिसरण वाढविण्यास व हृदयाच्या स्नायूंना बळकटी देण्यास मदत करतात. लिफ्टऐवजी पायऱ्या चढणे किंवा जेवणानंतर चालणे यांसारखे छोटे बदल उपयुक्त ठरू शकतात.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
“हृदयरोगाच्या आरोग्यासाठी फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, पातळ प्रथिने व आरोग्यदायी चरबी (जसे की काजू, बिया व ऑलिव्ह ऑइल) यांनी समृद्ध आहार घ्या. प्रक्रिया केलेले अन्न, ट्रान्स फॅट्स व साखरेचे प्रमाण जास्त असलेला आहार सेवन करण्यामुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल व इन्सुलिन प्रतिरोधकता वाढते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. नागेश, अल्कोहोलचे सेवन मर्यादित करण्याचा आणि धूम्रपान सोडण्याचा सल्ला देतात. जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन रक्तदाब वाढवते, हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करते आणि हृदयाच्या अनियमित लयीला कारणीभूत ठरते. “धूम्रपानामुळे जळजळ होऊ शकते आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे ब्लॉकेज निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळीदेखील कमी होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतात,” असे त्यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. नागेश म्हणतात, “दिवसभर पुरेसे पाणी प्या. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होईल आणि रक्त घट्ट होण्यापासून रोखता येईल, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. डिहायड्रेशनमुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर ताण येऊ शकतो.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
“कमी झोपेमुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि अनियमित हृदय गतीचा धोका वाढतो. हृदयाच्या कार्याला चालना देण्यासाठी आणि चयापचय व ताणाशी संबंधित हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी दररोज रात्री सात ते नऊ तासांची शांत झोप घेण्यास प्राधान्य द्या,” अशी शिफारस तज्ज्ञांकडून केली जाते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
![chhaava movie sarang sathaye as ganoji shirke and suvrat joshi as kanhoji](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/suvrat.jpg?w=300&h=200&crop=1)
“…अन् तळपायाची आग मस्तकात गेली”, ‘छावा’मध्ये सारंग साठ्ये अन् सुव्रत जोशीने कोणत्या भूमिका साकारल्या आहेत? पाहा झलक