-
अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे मूलांकवर आधारित आहे. मूलांक म्हणजे तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो त्याला मूलांक म्हणतात. उदा. तुमची जन्मतारीख २२ आहे तर तुमचा मूलांक हा २+२ = ४ असेन. (Photo : Frepik)
-
आज आपण मूलांक १ विषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला होतो, त्याचा मूलांक १ असतो. प्रत्येक मूलांकची एक खासियत असते. मूलांक १ असणारी व्यक्ती निर्भय असते. (Photo : Frepik)
-
अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक १ असतो, ते लोक पूर्णपणे स्वावलंबी असतात. त्यांना इतरांवर अवलंबून राहायला आवडत नाही. त्या लोकांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो. (Photo : Frepik)
-
ते ध्येयप्राप्तीसाठी कठीण परिश्रम घ्यायला नेहमी तयार असतात. ते स्वत:चे नशीब स्वत:बनवतात विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतो. (Photo : Frepik)
-
अंकशास्त्रानुसार, मूलांक १ असलेले व्यक्ती जीवनात भरपूर पैसा कमावतात. त्यांची आर्थिक स्थिती नेहमी उत्तम असते. या लोकांना कधीही धनसंपत्तीची कमतरता जाणवत नाही. (Photo : Frepik)
-
या लोकांना त्यांचे कौतुक ऐकायला खूप आवडते. या लोकांचे प्रेम संबंध चांगले असतात. मूलांक १ असलेल्या लोकांसाठी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस अत्यंत शुभ असतात. (Photo : Frepik)
-
हे लोक अतिशय प्रामाणिक असतात. ते स्वाभिमानी आणि निर्भय असतात. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा ते ठामपणे सामना करतात. (Photo : Frepik)
-
अंकशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, मूलांक १ असलेल्या व्यक्तीला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. ते उच्च शिक्षित असतात. त्यांना प्रत्येक प्रकारच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त होते. (Photo : Frepik)
-
ते लोक खूप रोमँटिक असतात. हे लोक स्वतंत्र्य विचारांचे असतात. त्यांना नोकरी करायला आवडत नाही. त्यांना व्यवसाय करायला आवडते. संगीत क्षेत्रात ते उत्तम असतात. (Photo : Frepik)
शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?