-
पोहे हा पदार्थ भारतातील विविध भागांत खाल्ला जातो. परंतु, महाराष्ट्रात ते खूप आवडीने खाल्ले जातात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापर्यंत कांदे पोहे लोकप्रिय आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पोहे खूप चविष्ट असतातच, शिवाय हा खूप पौष्टिक नाश्ता आहे; ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आतापर्यंत तुम्ही अनेकदा आवडीने पोह्यांचा आस्वाद घेतला असेल. पण, आज आम्ही तुम्हाला त्याचे फायदे सांगणार आहोत. (फोटो सौजन्य: Freepik) -
पोहे खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात, शिवाय सकाळच्या नाश्त्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे जे तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पोहे हे एक उत्कृष्ट प्रोबायोटिक अन्न आहे. ते आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर तुमची पचनशक्ती मजबूत करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
हे खूप हलके अन्न आहे आणि ते खाल्ल्याने अपचन किंवा पोटफुगीची समस्या उद्भवत नाही. संध्याकाळी किंवा सकाळी हलका नाश्ता म्हणून तुम्ही ते खाऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पोहे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. कारण पोह्यांमध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता यांचाही वापर केला जातो. यामुळे शरीराला प्रथिने, लोह आणि इतर आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतात. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्ही वजन कमी करत असाल तर अशा परिस्थितीतही पोहे तुमचे वजन कमी करण्याचे ध्येय पूर्ण करण्यास मदत करू शकतात. मात्र, पोहे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. पोहे खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही, शिवाय यामुळे तुम्ही सक्रिय राहता आणि ओवरईटिंग करणे टाळता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सकाळच्या नाश्त्यात पोह्यांचे सेवन केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटू शकते. पोह्यात कार्बोहायड्रेट्स आढळतात, जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. नाश्त्यात एक प्लेट पोहे नक्की खा. (फोटो सौजन्य: Freepik)

२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार