-
ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांव्यतिरिक्त काही ग्रह असे देखील आहेत ज्यांना सौर मंडळाचा भाग मानले जात नाही. परंतु त्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. अरूण, प्लूटो या ग्रहांव्यतिरिक्त वरूण ग्रहालाही खूप खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वरूण ग्रहाला ‘नेप्च्यून’ देखील म्हटले जाते. या ग्रहाला १२ राशींचे संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला तब्बल १६४ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे नेप्च्यूनच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर विविध प्रकारे होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, ११ सप्टेंबर २०२२ रोजी नेप्च्यून ग्रहाने कुंभ राशीमध्ये प्रवेश केला होता. तसेच १९ फेब्रुवारी २०२३ रोजी या ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला असून तो २७ जून २०२५ पर्यंत या राशीतच वराजमान असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच शुक्र ग्रहदेखील सध्या मीन राशीत विराजमान आहे. या राशीत या दोन ग्रहांची युती निर्माण झाली असून या दोन ग्रहांच्या युतीमुळे ‘माया’ योग निर्माण होत आहे ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या आयुष्यावर होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी माया योग अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी माया योग सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. या काळात अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
माया योग कन्या राशीसाठीही खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”