-
Kitchen jugaad video: बहुतांश घरांमध्ये सिलिंडरचा वापर जेवण तयार करण्यासाठी होतो. बहुतांश घरात शेगडी जवळ सिलिंडर ठेवण्यात येते. हा सिलिंडर लोखंडापडून तयार केले जातात. ज्यामुळे तो वजनाला फार जड असतात. स्वयंपाकघरात सिलिंडर जिथे ठेवला जाते, त्या ठिकाणी घाणेरडे गंजाचे डाग तयार होतात. (फोटो: युट्युब/ @Amy’s Trendy Tipsवरून साभार)
-
डाग कुठेच चांगले दिसत नाहीत. कपड्यावर असो अथवा किचनच्या टाईल्सवर. दिसायला हे खूपच घाण दिसते. पण त्यातही किचनमधील सिलिंडरचे डाग लादीवर उमटले तर लादीची चमक अधिक खराब होते. किचनच्या लादीचा रंग पांढरा असेल तर यावर हे डाग अधिक उठून दिसतात. (फोटो: युट्युब/ @Amy’s Trendy Tipsवरून साभार)
-
तसंच सिलिंडर ज्या भागात ठेवला जातो तिथेही डाग उमटलेले दिसतात. मग अशा वेळी जर स्वच्छता करायची असेल आणि सिलिंडरचे डाग घालवायचे असतील तर मात्र खूप विचार करावा लागतो. पण आता तुम्हाला डोकं खाजवावं लागणार नाही तर किचनमधील सिलिंडरचे डाग घालविण्यासाठी तुम्ही सोप्या हॅक्सचा वापर करा. (फोटो: युट्युब/ @Amy’s Trendy Tipsवरून साभार)
-
दरम्यान, गृहिणींसाठी आम्ही एक जुगाड घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला सिलिंडर टिकली लावायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सिलिंडर टिकली कशाला? (फोटो: युट्युब/ @Amy’s Trendy Tipsवरून साभार)
-
तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. (फोटो: युट्युब/ @Amy’s Trendy Tipsवरून साभार)
-
तुम्ही सिलिंडर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी टिकलीच्या पाकिटाचा वापर करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला टिकलीच जुनं जे तुम्ही वापरत नाहीये असं पॅकेट घ्यायचं आहे. त्यावरच्या टिकल्या काढून सिलिंडरवर लावल्या तरी चालतील. (फोटो: युट्युब/ @Amy’s Trendy Tipsवरून साभार)
-
त्यानंतर हे रिकामं पाकीट तुम्ही सिलेंडरच्या खाली ठेऊन सिलिंडर सहजपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकवून नेऊ शकता. यामुळे टाईल्सवर रेघोट्या पडणार नाहीत आणि सिलिंडर सरकवून नेणं सोपं होऊ शकेल. (फोटो: युट्युब/ @Amy’s Trendy Tipsवरून साभार)
-
@Amy’s Trendy Tips यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. (फोटो: युट्युब/ @Amy’s Trendy Tipsवरून साभार)
-
(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?