-
Travel Guid : मार्च हा प्रवासासाठी सर्वोत्तम महिना आहे. हिवाळा संपण्यापूर्वी आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वी, जर तुम्हाला बर्फाळ प्रदेशात फिरायचे असे तर तुम्ही पुढील ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता. मार्चमध्ये फिरण्यासाठी ५ बेस्ट ठिकाणांविषयी जाणून घेऊ..
-
केलांग :
केलांग हे हिमाचल प्रदेशातील एक कमी प्रसिद्ध पण सुंदर हिल स्टेशन आहे. लाहौल जिल्ह्यात असलेल्या केलांगमधील ट्रीप एक संस्मरणीय अनुभव असेल. समुद्रसपाटीपासून १०,००० फूटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या केलांगमध्ये मार्च महिन्यात बर्फ पडेल. केलांगमध्ये, करदांग मठ, बुद्ध गुहा, पांगी व्हॅली, शशूर मठ, भागा व्हॅली आणि स्थानिक बाजारपेठांना भेट देऊ शकता. -
काश्मीर : काश्मीर
काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. मार्च हा काश्मीरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला येथील तापमान अनुकूल असते. मार्च महिन्यातही काश्मीरमध्ये बर्फ पडतो. काश्मीरमध्ये सोनमर्ग, गुलबर्ग, श्रीनगर, दाल सरोवर यासह अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत -
सिक्कीम
उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच मार्चमध्ये सिक्कीम हे भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. सिक्कीम पूर्वेला ढगांना भिडणारे आणि बर्फाने झाकलेले उंच पर्वत, दाट हिरवीगार जंगले, तलाव आणि झरे सिक्कीमच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात. मार्चमध्ये उत्तर सिक्कीममध्ये बर्फ पडतो. सिक्कीममध्ये, त्सोमो तलाव, चोपता व्हॅली, युमथांग व्हॅली, लाचुंग गाव आणि नाथुला व्हॅली यासारख्या आकर्षक ठिकाणांना भेट देता येते. (छायाचित्र: फ्रीपिक) -
मुन्नार
मार्चमध्ये भेट देण्यासाठी केरळमधील मुन्नार हिल स्टेशन हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे, रोझ गार्डन, इको पॉइंट, अनामुडी शिखर आणि लक्कम वॉटरफॉल सारख्या आकर्षक ठिकाणांना भेट देऊ शकता. मुन्नारमध्ये चहाचे मळे पाहण्यासारखे आहेत, पर्यटक येथे साहसी खेळांचा आनंद घेऊ शकतात. -
महाबळेश्वर
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. मधुचंद्रासाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर हे हिल स्टेशन, उंच पर्वत, घनदाट जंगले, थंड हवा आणि खाऱ्या पाण्याचे झरे आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटक ट्रेकिंग, हायकिंग आणि कॅम्पिंग सारख्या साहसी खेळांचा थरार देखील अनुभवतात. (सर्व फोटो: फ्रीपिक)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल