-
देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी हा रंगांचा सण आहे आणि या दिवशी लोक एकमेकांवर रंग उधळून होळी साजरी करतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
होळीच्या दिवशी विविध प्रकारचे पदार्थ देखील तयार केले जातात. खवा अनेक पदार्थ बनवण्यासाठी देखील वापरला जातो. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
खव्याची वाढती मागणी लक्षात घेता, होळीच्या निमित्ताने अनेकदा भेसळयुक्त खवा विकला जातो. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही खवा भेसळयुक्त आहे की नाही, हे सहजपणे ओळखू शकता. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
खव्याचा एक छोटा गोळा बनवा आणि तो तळहातावर ठेवा. जर तो गोळा सपाट आणि गोल झाला नाही आणि तुटू लागला आणि त्यात भेगा पडल्या तर खवा भेसळयुक्त आहे, असे समजावे. (छायाचित्र: फ्रीपिक) -
तुम्ही खवा बोटांवर घासून त्याची शुद्धता तपासू शकता. जर खवा घासल्यावर रबरासारखा वाटला आणि केमिकलचा वास आला तर तो भेसळयुक्त आहे, असे समजावे. शुद्ध खवा हा दाणेदार आणि गुळगुळीत असतो. (छायाचित्र: Pinterest) -
भेसळयुक्त किंवा बनावट खवा कोणताही सुगंध देत नाही. तर, खऱ्या खवाला दुधाचा सुगंध येतो. (छायाचित्र: Pinterest) -
तोंडात थोडासा खवा टाका आणि जर त्याची चव कडू असेल तर तो खवा भेसळयुक्त असू शकतो. (छायाचित्र: Pinterest) -
एका भांड्यात गरम पाण्यात थोडे आयोडीन आणि एक किंवा दोन चमचे खवा टाका. जर त्याचा रंग निळा दिसत असेल तर तुमचा खवा भेसळयुक्त असू शकतो. (छायाचित्र: Pinterest) -
भेसळयुक्त खवा ६ ते ७ दिवस खराब होत नाही तर शुद्ध मावा २४ तास चांगला राहतो त्यानंतर तो खराब होऊ शकतो. (छायाचित्र: Pinterest) -
खरा खवा ओळखण्यासाठी, थोडासा खवा घ्या आणि तो तोंडात ठेवा, जर तो विरघळला तर तो खरा खवा आहे. भेसळयुक्त खवा तोंडाला चिकटू शकतो. (फोटो: Pinterest)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती