-
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रहांचे राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पाहायला मिळतो. नवग्रहांत राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. जो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
३० ऑक्टोबर २०२३ रोजी राहू ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला होता. राहू केवळ दीड वर्षातून एकदा आपली चाल बदलतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
सध्या राहू मीन राशीत विराजमान असून, तो मे २०२५ पर्यंत याच राशीमध्ये राहणार आहे. त्यानंतर राहू शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
त्यामुळे सध्या मीन राशीत असलेला राहू पुढील ६० दिवस इतर राशींच्या काही व्यक्तींना शुभ फळ देईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीत विराजमान असलेला राहू ग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीतील राहू सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही पुढचे ६३ दिवस शुभ फळ देणारा असेल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीत विराजमान असलेला राहू ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Goa: “परत कधीच गोव्याला येणार नाही”, पर्यटकाने सोशल मीडियावर शेअर केला गोव्यातील भयावह अनुभव