-
मुघल कालखंड केवळ त्याच्या भव्य इमारती, राजवाडे आणि ऐतिहासिक युद्धांसाठीच नव्हे तर तो त्यांच्या समृद्ध खाद्य परंपरेसाठी देखील प्रसिद्ध आहे. मुघलांनी भारतीय स्वयंपाकघरात अनेक अनोखे आणि स्वादिष्ट पदार्थ जोडले आहेत, जे अजूनही त्यांची खास ओळख टिकवून आहेत. दही, काजू, सुकामेवा, केशर आणि सुगंधी मसाल्यांनी समृद्ध असलेले हे पदार्थ केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहेत. तुम्हालाही मुघलाई चव आवडत असेल, तर या १० सर्वोत्तम पदार्थांबद्दल जाणून घ्या जे मुघल कालखंडात भारतात आले आणि आजही तितकेच लोकप्रिय आहेत. (PC : Pexels)
-
बिर्याणी
बिर्याणी ही मुघल पाककृतीतील सर्वोत्तम देणगी मानली जाते. हा एक बास्मती तांदळापासून बनवलेला पदार्थ आहे. यामध्ये भाताबरोबर चिकन किंवा मटणही असतं. यातील मटण किंवा चिकन हे मसाले, दही आणि काही औषधी वनस्पतींमध्ये मॅरीनेट करून शिजवले जाते त्यानंतर त्यात भात मिसळला जातो. केशर आणि तुपाचा सुगंध बिर्याणीला आणखी खास व समृद्ध बनवतो. आज हैदराबादी, लखनवी आणि कोलकाता स्टाईल बिर्याणी जगभर प्रसिद्ध आहेत. (PC : Pexels) -
चिकन कोरमा
चिकन कोरमा ही एक पारंपारिक मुघलाई डिश आहे, यामध्ये चिकन दही, काजू, बदाम आणि सुगंधी मसाल्यांसह मंद आचेवर शिजवले जाते. यामधील मलाईदार ग्रेव्ही या पदार्धाला शाही चव देते. हा पदार्थ नान, पराठा किंवा रोटीसोबत सर्व्ह केला जातो. (PC : Pexels) -
गलोटी कबाब
गलोटी कबाब हा लखनौचा एक खास मुघलई पदार्थ आहे जो नवाबी शैलीत बनवला जातो. ही मटणाची डिश १०० हून अधिक मसाल्यांचा वापर करून बनवली जाते. (PC : Pexels) -
मुघलाई पराठा
मुघलाई पराठा हा एक भरलेला पराठा आहे, ज्यामध्ये मटणाचे किसलेले मांस, अंडी आणि मसाले भरलेले असतात. हे तव्यावर किंवा तंदूरवर शिजवले जातात आणि चटणी किंवा दह्यासोबत खायला दिले जातात. बंगाल आणि बिहारमध्ये हा पदार्थ अजूनही खूप लोकप्रिय आहे. (PC : Pexels) -
मुर्ग मुसल्लम
मुर्ग मुसल्लम ही एक शाही डिश आहे यामध्ये चिकन मसाले, सुकामेवा आणि अंड्याचा वापर करून मॅरीनेट केले जाते आणि नंतर बेक केले जाते किंवा भाजले जाते. मुघल सम्राटांच्या मेजवानीचे हे मुख्य आकर्षण असायचे. (PC : Pexels) -
मटण सीख कबाब
मटण सीख कबाब हा एक लोकप्रिय मुघलाई पदार्थ आहे ज्यामध्ये बारीक केलेले मटण विशेष मसाल्यांमध्ये मॅरीनेट केले जाते आणि लोखंडी तारांवर ग्रिल केले जाते. स्टार्टर म्हणून ही डिश आजही आवडीने खातात. (PC : Pexels) -
नल्ली निहारी
मुघल दरबारात निहारी हा एक खास नाश्ता असायचा. यात रात्रभर मंद आचेवर मसाल्यांसह मटण शिजवले जाते. हा पदार्थ तंदुरी रोटी किंवा नानबरोबर खातात. (PC : Pexels) -
नर्गिसी कोफ्ता
नर्गिसी कोफ्ता ही एक अनोखी डिश आहे जिथे उकडलेले अंडे मसालेदार मटणात मिसळली जातात. त्यानंतर तळली आणि नंतर स्वादिष्ट ग्रेव्हीमध्ये शिजवली जातात. (PC : Pexels) -
रोगन जोश
रोगन जोश हा मूळचा काश्मिरी पदार्थ आहे, परंतु मुघल स्वयंपाकघरांमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. या डिशमध्ये, मटण मंद आचेवर अनेक मसाल्यांसह विशेषतः काश्मिरी लाल मिरची घालून शिजवले जाते. याचा रस्सा लोकांना खूप आवडतो. (PC : Pexels) -
शाही तुकडा
जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्हाला शाही तुकडा नक्कीच आवडेल. हे एक मुघलाई मिष्टान्न आहे ज्यामध्ये तळलेले ब्रेडचे तुकडे साखरेच्या पाकात बुडवले जातात आणि केशर व वेलची टाकून बनवलेल्या क्रिमी रबडीत मिशळले जातात. त्यानंतर सुक्या मेव्याने सजवून दिले जातात. (PC : Pexels)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही