-
शरीराचा कोणताही भाग अनहेल्दी असेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होत असतो. तसेच तोंडातील खराब हिरड्यांचा आपल्या दातांवर, एकूणच संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे निरोगी राहण्यासाठी तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर हिरड्या निरोगी नसतील तर त्यांना संसर्ग होऊ शकतो आणि दात पडणे किंवा किडणे अशा समस्याही उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याशिवाय अनहेल्दी हिरड्यांमुळे हृदयविकार, मधुमेह, अल्झायमर आणि गर्भधारणेदरम्यान अनेक समस्या होऊ शकतात, त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेसाठी दातांची तपासणी आणि सकस आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत हिरड्या निरोगी ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला आज आठ टिप्स सांगणार आहोत…
-
धूम्रपान करणे थांबवा : धूम्रपान केवळ दात काळेच करत नाही तर हिरड्यांचे आजार होण्यासदेखील कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे धूम्रपान सोडल्यास हिरड्यांचे आरोग्य सुधारू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ब्रुक्सिझमला प्रतिबंध करा : ब्रुक्सिझम ही एक समस्या आहे, ज्यामध्ये काही लोकांना दात घासण्याची सवय असते. यामुळे हिरड्यांच्या वरच्या भागाला इजा किंवा संसर्ग होऊ शकतो. ब्रुक्सिझम टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी माउथ गार्ड घालू शकतो आणि तणाव कमी करण्याच्या पद्धतींचा अवलंब करू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नियमित तपासणी करा : नियमित अंतराने तुमच्या दंतवैद्याला भेट द्या, यामुळे दात निरोगी राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मऊ टूथब्रश निवडा : मऊ ब्रिस्टल्स असलेला टूथब्रश वापरा, ज्यामुळे हिरड्यांना दुखापत होणार नाही आणि ते निरोगी राहतील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
फ्लॉसिंग : फ्लॉसिंगमुळे दातांची खोलवर स्वच्छता होते. जेवण करताना दातांमध्ये अन्न फसतं, ज्यामुळे तोंडात अनेक बॅक्टेरिया निर्माण होतात. दातांमध्ये फसलेले अन्न कण काढण्यासाठी एका बारीक धाग्याने स्वच्छता केली जाते, त्यामुळे फ्लॉस करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे तुमच्या दातांमधील मोकळी जागा स्वच्छ करते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
माउथवॉश वापरा : माउथवॉश वापरल्याने तुमच्या तोंडातील उरलेले बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत होते, तुमचे तोंड ताजे राहते आणि आतड्यांचे आरोग्य राखते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
संतुलित आहार घ्या : फळे, भाज्या, अंडी, कडधान्ये, मासे आणि दूध असा संतुलित आहार घ्या. त्यामध्ये असलेले पोषकतत्व तुमच्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल