-
पालकांना अनेकदा त्यांच्या मुलाच्या आहाराची काळजी असते. त्यामुळे आपल्या मुलांना काय खायला द्यावे; जेणेकरून ती निरोगी राहतील, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मुलांचे शरीर बळकट करण्यासाठी, सकाळी उठल्याबरोबर त्यांना रिकाम्या पोटी काही पदार्थ दिले पाहिजेत जे त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतील. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मुलांचा मेंदू आणि हाडे मजबूत करण्यासाठी, तुम्ही त्यांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता, ज्यामुळे त्यांना मजबूत होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: Freepik) -
जेव्हा मुलं सकाळी उठतात तेव्हा सगळ्यात आधी त्यांना रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायला द्या, ज्यामुळे त्यांचे चयापचय वाढेल. त्यामुळे ती निरोगी राहतील आणि त्यांचे शरीर निरोगी राहील.(फोटो सौजन्य: Freepik) -
बदाम मेंदूला तीक्ष्ण बनवून आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर मुलाला बदाम द्यावेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुमचे मूल मोठे असेल, तर त्याला रात्री पाण्यात भिजवलेले बदाम खायला द्या. जर तुमचे मूल लहान असेल, तर तुम्ही त्याला किसलेले बदामदेखील देऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
केळी पोटासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते. केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि झिंक असते. त्यासोबतच त्यात सोडियम आणि लोहदेखील आढळते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कमी वजनाच्या मुलांना सकाळी खायला द्यावे. असे केल्याने त्यांचे वजन लवकर वाढते. एवढेच नाही, तर केळी खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आवळा सर्वांसाठी फायदेशीर आहे. जर तुमच्या बाळाची दृष्टी कमकुवत असेल, तर तुम्ही त्याला मोरावळा खायला देऊ शकता. त्यात मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात, जे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का