-
आपल्यातील अनेक जण चहा किंवा काही कॉफीप्रेमीसुद्धा आहेत. कोणाची चहाचे सेवन केल्याशिवाय झोप उडत नाही, तर कोणाला दिवसातून दोन ते तीन वेळा कॉफीचे सेवन केल्याशिवाय जमत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सध्या विविध कॅफेमध्ये कॅपुचिनो, लाटे, गरम कॉफी, कोल्ड कॉफी, फिल्टर कॉफी असे कॉफीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. पण, सध्या बुलेट कॉफीसुद्धा बरीच चर्चेत आहे. सेलिब्रिटींमध्ये या कॉफीची बरीच क्रेझ पाहायला मिळते आहे, ज्याला प्री-वर्कआउट ड्रिंक म्हणून अनेकदा ओळखले जाते. तर सकाळी ऊर्जा वाढवणारी ही बुलेट कॉफी मधुमेह (डायबेटीस) असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे का? (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली आहे आणि ट्रेंडी पेय किंवा कॉफी दिनक्रमात समाविष्ट करण्याआधी डायबेटीस असणाऱ्यांना त्यामुळे कोणते धोके उद्भवू शकतात आणि त्यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे समजून घेतले.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
कमल मेडिकल केअर फिजिशियन अॅण्ड एस्थेटिक क्लिनिकचे पीजीपी (डायबेटोलॉजी) सल्लागार फिजिशियन डॉक्टर कमलजीत सिंग कैंथ (Kamaljit Singh Kainth) म्हणाले की, बुलेट कॉफी, ज्याला बटर कॉफीदेखील म्हणतात. हे एक हाय फॅट्स आणि कमी कार्ब असलेले पेय आहे. ही मीठ नसलेले बटर (unsalted butter) व मीडियम चेन ट्रायग्लिसराइड (MCT) तेलासह कॉफीचे मिश्रण करून बनवले जाते. केटोजेनिक आहाराचे (ketogenic diets) पालन करणाऱ्या बहुतांशी व्यक्ती या कॉफीचे सेवन करतात. बुलेट कॉफी कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी ठेवून ऊर्जा वाढवण्याचे काम करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
डॉक्टर म्हणाले की, मधुमेहाच्या रुग्णांसाठी याची शिफारस करण्यात आलेली नाही. कारण- बुलेट कॉफीमधील हाय फॅट्स कन्टेन्ट रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करू शकते; विशेषतः जर तुम्ही कर्बोदकांमधे कमी घेत असाल. पण, बुलेट कॉफीमधील बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे चिंता निर्माण होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
विशेषत: जर तुम्हाला आधीच हृदयाशी संबंधित समस्या असतील, तर मधुमेह असणाऱ्यांच्या बाबतीत ही एक सामान्य समस्या आहे. त्यांनी असेही सांगितले की, बुलेट कॉफी मायक्रोव्हस्क्युलर, मॅक्रोव्हस्क्युलर व ब्लॉकेजेसची शक्यता वाढवू शकते.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
ल्युसीन रिच बायोचे सह-संस्थापक व संचालक डॉ. देबोज्योती धर (Debojyoti Dhar) यांनी सांगितले की, बुलेट कॉफीमधील मुख्य घटक असलेल्या सॅच्युरेटेड फॅट्सचे जास्त प्रमाणात सेवन करणाऱ्या मधुमेही रुग्णांना धोका निर्माण होऊ शकतो. कारण- त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढून, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा ट्रेंडवर दीर्घकालीन विसंबून न राहण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जर तुम्हाला डायबेटीस असेल आणि बुलेट कॉफी पिण्याचा तुम्ही विचार करीत असाल, तर डॉक्टर धर यांनी सांगितले की, तुम्ही याबाबत प्रथम तुमच्या डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा आणि तुम्ही योग्य आहार घेत आहात याची खात्री करून घ्या. सुरुवातीला या कॉफीचे अगदी थोड्या प्रमाणात सेवन करा आणि तुमचे शरीर या सेवनाला कसा प्रतिसाद देते ते बघा.(फोटो सौजन्य: @Freepik)
