-
सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कडक उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. या काळात लोक एअर कंडिशनर (एसी) देखील खूप वापरतात. पण उन्हाळा संपताच एसी वापरणं बंद केलं जातं. पण अनेक महिने एसी बंद ठेवल्यानंतर, त्याला सर्व्हिसिंगची आवश्यकता आहे की नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
-
घरातील एसीला सर्व्हिसिंगची आवश्यकता आहे का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढील काही टिप्स फॉलो करु शकता.
-
आवाजावरून ओळखा: जर एसीमधून विचित्र आवाज करत असेल तर समजून घ्या की त्याची सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे.
-
जर गरम हवा सतत येत राहिली तर : जर एसी चालू करुनही खोली व्यवस्थित थंड होत नसेल किंवा एसीमधून गरम हवा बाहेर पडत असेल, तर एसीला सर्व्हिसिंगची आवश्यकता आहे.
-
पाणी येणे : जर एसी युनिटमधून पाणी बाहेर पडत असेल किंवा एसीमधून रेफ्रिजरंट किंवा कंडेन्सेशन लाईन्स गळत असतील तर त्याची त्वरित सर्व्हिसिंग करावी.
-
वीज बिल: जर एसी वापरल्यानंतर वीज बिल खूप जास्त येत असेल, तर तुम्ही त्याची त्वरित सर्व्हिसिंग करुन घ्यावी.
-
आर्द्रता जाणून घ्या : उन्हाळ्यात एसी चालू असताना घरात जास्त आर्द्रता असेल तर अशावेळी एसी दुरुस्त करुन घेणे गरजेचे आहे,
-
व्हेंट तपासा: एसी व्हेंटमध्ये जा आणि हवा व्यवस्थित बाहेर येत आहे का ते तपासा. जर ते बाहेर येत नसेल तर त्याची सर्व्हिसिंग करा.
-
वास: जर एअर कंडिशनरमधून विचित्र वास येत असेल तर त्याची लवकरात लवकर सर्व्हिसिंग करावी. (फोटो- पेक्सेल्स, फ्रीपिक)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स