-
आजकाल रात्री उशिरापर्यंत जागणे हे आपल्या दैनंदिन जीवनाता एक भाग बनत आहे. कधी ऑफिसच्या कामामुळे तर कधी मोबाईल वापरामुळे रात्री उशीरापर्यंत जागतो. पण ही सवय तुमचे आरोग्य पूर्णपणे बिघडवत आहे.
-
जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे दररोज १२-१ वाजेपर्यंत जागे राहतात, तर थोडे सावधगिरी बाळगा, कारण उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे तुमच्या आरोग्यासाठी तितकेसे फायदेशीर नाही. तुम्ही वेळेवर झोपायला हवे आणि रात्रीची पूर्ण झोप घ्यायला हवीच.
-
उशिरापर्यंत जागे राहण्याचे तोटे : झोपेच्या कमतरतेचे परिणाम केवळ थकवा किंवा आळसच येत नाही तर हळूहळू त्याचा रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
-
सतत झोप कमी केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. जास्तवेळ जागे राहिल्याने हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे वजन वाढते. झोपेच्या अभावामुळे चिडचिडेपणा, ताण आणि नैराश्यासारख्या समस्या वाढू लागतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर मुरुमांची समस्या जाणवू लागते.
-
किती झोप आवश्यक आहे? रात्री १० ते ११ च्या दरम्यान झोपण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी ३० मिनिटे आधी तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही बंद करा. झोपण्यापूर्वी तुम्ही कोमट दूध किंवा हर्बल टी पिऊ शकता. झोपण्याची जागा मंद प्रकाशमय आणि शांत असावी.
-
रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय कशी मोडायची? दररोज हळूहळू तुमची झोपण्याची वेळ १५-२० मिनिटे आधी करा. दिवसातून एकदा शारीरिक हालचाल करायला विसरू नका. तुमचे मन शांत करण्यासाठी, पुस्तक वाचा किंवा ध्यान करा.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल