-
प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. काही जणांची त्वचा अगदी कापसासारखी मऊ, तर काहींची तेलकट तर अनेकांची कोरडी त्वचासुद्धा असते. तर हवामानातील बदलांमुळे कधी कधी चेहऱ्यावर कोरडेपणा दिसून येतो. यामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात. हे डाग लपवण्यासाठी आपण अनेकदा बाजारात मिळणारे मॉइश्चरायझर वापरतो, ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, त्याचा परिणाम थोड्या काळासाठीच चेहऱ्यावर दिसून येतो. पण, त्याऐवजी तुम्ही चेहऱ्यावर दही वापरले तर तुमची त्वचा मुलायम होऊ शकते. बाहेरून मॉइश्चरायझर विकत घेण्यापेक्षा दह्याचा उपयोग करून पाहा. दह्याचा नक्की कसा वापर करायचा ते जाणून घेऊया…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
दह्याचा फेस पॅक कसा बनवायचा?
साहित्य : दोन चमचे दही, एक चमचा मध, एक चमचा ओट्स इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik) -
कृती :
रात्रभर ओट्स भिजवत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवा.(फोटो सौजन्य: @Freepik) -
त्यानंतर त्या पेस्टमध्ये दही आणि मध घाला. नंतर त्यात रोझ वॉटर घाला. थोड्या वेळासाठी ही पेस्ट अशीच ठेवून द्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यानंतर त्या पेस्टमध्ये दही आणि मध घाला. नंतर त्यात रोझ वॉटर घाला. थोड्या वेळासाठी ही पेस्ट अशीच ठेवून द्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
‘या’ पॅकचा वापर कसा करायचा?
ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून घ्या.आता ब्रशच्या मदतीने पॅक चेहऱ्यावर लावा.(फोटो सौजन्य: @Freepik) -
नंतर १० ते २० मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पॅकमधील मध, त्वचा उजळ करण्यात मदत करते, ज्यामुळे तुमची त्वचा मुलायम, चमकदार दिसेल आणि दही चेहऱ्याला मॉइश्चराइज करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी:
चेहऱ्यावर काहीही लावण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करून घ्या.
दह्यामध्ये लैक्टिक ॲसिड असते, त्यामुळे आठवड्यातून एकदाच हा उपाय करून पाहा.
दह्यामध्ये कोणतीही नवीन गोष्ट घालण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या, जेणेकरून तुमच्या त्वचेला कोणतीही ॲलर्जी होणार नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड