-
एप्रिल महिना सुरू होत आहे. सगळीकडे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. या दरम्यान खूप जास्त थंड पाणी प्यायची इच्छा होते. उन्हाळ्याच्या कडक महिन्यांत बहुतेक लोक थंड पाण्यासाठी फ्रिज किंवा बर्फावर अवलंबून असतात. पण अनेक जण आरोग्यास चांगले नाही म्हणून फ्रिजमधील पाणी पिणे टाळतात.
-
पाणी कसे थंड करावे?
जर तुमच्या घरी फ्रीज नसेल, तर तुम्ही पाणी थंड करण्यासाठी या टिप्स फॉलो करू शकता. आज आपण नैसर्गिकरित्या पाणी थंड करण्याचे काही मार्ग जाणून घेणार आहोत जे तुम्ही उन्हाळ्यात फॉलो करू शकता. या पद्धतीने थंड केलेले पाणी तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते. -
तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा
तांब्याच्या भांड्यांचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी थंड ठेवू शकता. खरं तर, तांबे तापमान नियंत्रित करू शकतो जेणेकरून पाणी बराच काळ थंड राहील आणि तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. -
बाटलीला ओले कापड गुंडाळा:
तुम्ही बाटलीबंद पाणी थंड देखील ठेवू शकता. यासाठी, सर्वप्रथम, बाटली पाण्याने भरा. नंतर बाटलीभोवती ओले सुती कापड गुंडाळा आणि सावलीत ठेवा. तुम्ही ते हवेत देखील ठेवू शकता. अशा प्रकारे पाणी दीर्घकाळासाठी थंड राहील. -
माठातील पाणी
माठाचा वापर शतकानुशतके पाणी थंड करण्यासाठी केला जात आहे. खरं तर, भांड्यात पाणी ओतल्यानंतर ते पाणी हळूहळू थंड होते. जर तुम्हाला खरोखर थंड पाणी हवे असेल तर माठ सावलीत ठेवा. तुम्ही त्याभोवती ओले कापड देखील गुंडाळू शकता.

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा