-
निसर्गाने आपल्याला अनेक औषधी देणग्या दिल्या आहेत आणि मध हा त्यापैकी एक अमूल्य खजिना आहे. शतकानुशतके, आयुर्वेद आणि घरगुती उपचारांमध्ये मधाचा वापर नैसर्गिक औषध म्हणून केला जात आहे. (छायाचित्र : पेक्सेल्स)
-
त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स, अँटिबॅक्टेरियल गुण आणि आवश्यक पोषक तत्वे अनेक त्रासांवर उपचार करण्यासाठी पुरेसे असतात. जाणून घेऊयात मधाच्या सात आश्चर्यकारक उपचारात्मक गुणधर्मांबद्दल (छायाचित्र : पेक्सेल्स)
-
रोगप्रतिकारशक्ती वाढवणे
मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि जीवाणूनाशक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हे व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात आणि तुम्हाला सामान्य सर्दीपासून सुरक्षित ठेवतात. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
घसा खवखवणे आणि खोकल्यापासून आराम
जर तुमचा घसा वारंवार दुखत असेल किंवा तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल, तर एक चमचा मध चमत्कार करू शकतो. मध घशावर एक थर तयार करून खवखव आणि खोकला कमी करतो, ज्यामुळे त्वरित आराम मिळतो. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
पचनसंस्था निरोगी राहते
मधात प्रीबायोटिक गुणधर्म असतात जे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन देतात. हे इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारख्या समस्यांपासून आराम देऊ शकतात आणि एकूण पचनसंस्थेचं आरोग्य सुधारू शकता. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
जखमा भरण्यास मदत करते
बाह्य जखमा (शरिरावरील जखमा), भाजलेले किंवा शस्त्रक्रियेच्या जखमांवर मध लावल्याने त्या लवकर बऱ्या होण्यास मदत होते. त्याचे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संसर्ग रोखतात आणि त्वचा बरी होण्यास मदत करतात. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
त्वचेसाठी फायदेशीर
मधातील मॉइश्चरायझिंग आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे तो त्वचेची काळजी घेण्यासाठी एक नैसर्गिक पर्याय बनतो. मुरुम, कोरडी त्वचा आणि त्वचेच्या किरकोळ संसर्गांपासून आराम देतो. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
रक्तातील साखर नियंत्रित होते
मध हा साखरेचा स्रोत असला तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास मध रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतो, विशेषतः रिफाइंज शुगरच्या तुलनेत मध उत्तम मानला जातो. (छायाचित्र : पेक्सेल्स) -
झोप चांगली होते
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध घेतल्याने झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. शरीरात मेलाटोनिनच्या वाढीस मदत होते. रक्तातील साखरेची पातळी संतुलित होते, ज्यामुळे गाढ झोप लागते. (छायाचित्र : पेक्सेल्स)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल