-
उन्हाळा सुरू झाला आहे आणि या कडक उन्हात आरोग्याची काळजी घेणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे झाले आहे. अशा परिस्थितीत तुमच्या खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
-
विशेषतः जर तुम्हाला मांसाहारी पदार्थ खाण्याची आवड असेल, तर त्यामुळे तुमच्या तब्येतीवर कोणते वाईट परिणाम होऊ शकतात ते नक्की पाहा.
-
उन्हाळ्यात मांसाहारी खाणे पूर्णतः बंद करणे आवश्यक नाही; परंतु ते खाताना जिभेवर ताबा ठेवणे मात्र गरजेचे आहे.
-
या खाण्याचे प्रमाण कमी न केल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
-
१. पचन समस्या उन्हाळ्यात शरीराची पचनशक्ती अनेकदा कमकुवत होते. अशा परिस्थितीत मांस, मासे किंवा अंडी यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. मांसाहारी पदार्थ पचविण्यासाठी शरीराला जास्त वेळ आणि ऊर्जा लागते, त्यामुळे अपचन आणि जडपणासारख्या समस्या उद्भवतात.
-
२. शारीरिक उष्णतेत वाढ उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे मांसाहारी खाण्यामुळे शरीराचे अंतर्गत तापमान आणखी वाढू शकते. आयुर्वेदात मांसाहार हा ‘गरम अन्न’ मानला जातो. त्यामुळे निर्जलीकरण, डोकेदुखी, उष्माघात यांसारख्या समस्या ओढवू शकतात.
-
३. अन्न विषबाधेचा धोका उन्हाळ्याच्या महिन्यात जीवाणू आणि बुरशी वेगाने वाढतात. अशा परिस्थितीत जर मांसाहारी पदार्थ योग्य तापमानात साठवले नाहीत किंवा ते योग्य रीत्या शिजवले नाहीत, तर अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो. हे विशेषतः मुले आणि वृद्धांसाठी हे धोकादायक ठरू शकते.
-
४. निर्जलीकरण आणि थकवा मांसाहारी जेवण पचविण्यास अधिक वेळ लागत असल्यामुळे शरीराला त्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा जास्त प्रमाणात वापरली जाते. परिणामत: थकवा जाणवू लागतो.
-
या सर्व आजारांवर उपाय काय? मांसाहारी पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. हलक्या आणि ताज्या भाज्यांचे सेवन वाढवा, मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा. ताजे खा, पाण्याचे सेवन वाढवा व हायड्रेटेड राहा आणि लिंबूपाणी, नारळपाणी यांसारख्या थंड पेयांचा आहारात समावेश करा.
Indian Man : “प्रामाणिकपणाचं फळ! माझा व्हिसा ४० सेकंदात नाकारला आणि अमेरिकेला…”; भारतीय नागरिकाची पोस्ट चर्चेत