-
कालांतराने, आपले दात पिवळे आणि घाणेरडे दिसू लागतात. पिवळे दात कोणालाही आवडत नाहीत.
-
प्रत्येकालाच आपले दात मोत्यासारखे चमकावे असे वाटते. पण अनेक लोकांच्या दातांवर पिवळ्या रंगाचा जाड थर असल्याने त्यांची इच्छा अपूर्णच राहते.
-
दात पिवळे होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की खाण्याच्या सवयी, औषधे, धूम्रपान किंवा तोंडाची स्वच्छता न राखणे, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स इत्यादी.
-
जर तुम्हालाही तुमचे दात मोत्यासारखे चमकवायचे असतील तर तुम्ही ‘या’ सालीचा वापर करू शकता.
-
दातांसाठी संत्र्याच्या सालीचा वापर : संत्री आरोग्यासाठी उत्तम मानली जातात. पण केवळ संत्र्याच नाही तर त्यांची सालही अनेक आरोग्यदायी फायदे देण्यासाठी उपयुक्त आहे. कारण त्यात फायबर, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अनेक गुणधर्म आहेत.
-
जर तुम्हाला तुमचे पिवळे दात पांढरे करायचे असतील तर तुम्ही संत्र्याची साल दातांवर घासू शकता.
-
इतकेच नाही तर जर तुम्ही दररोज एक संत्र्याचे सेवन केले तर ते तुमचे दात स्वच्छ ठेवू शकते आणि तोंडात बॅक्टेरिया निर्माण होण्यासही प्रतिबंध करू शकते.
-
संत्र्याच्या सालीच्या पावडरने टूथपेस्ट बनवा : संत्र्याच्या सालीची पेस्ट बनवण्यासाठी संत्र्याच्या सालीची पेस्ट करा. त्यात थोडे मीठ आणि मोहरीचे तेल घाला.
-
सर्वकाही मिसळा आणि ब्रशने दातांना लावा आणि दात घासा. असे केल्याने दात चमकू लागतील आणि दातांवर साचलेली घाण साफ होईल.

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी