-
१. शुद्ध मध मध हा नैसर्गिक आर्द्रता राखणारा घटक आहे. त्यात जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे त्याद्वारे चेहऱ्यावरील मळ आणि मृत त्वचा कमी होते. त्यामुळे मग त्वचा मऊ आणि उजळ दिसते.
-
२. गाईचे दूध पूर्ण स्नेहयुक्त दूध त्वचेला सौम्यपणे स्वच्छ करते. चेहऱ्यावर दूध लावून हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचा उजळते व मऊ बनते.
-
३. ओट्स (जवसाचे कण) ओट्स त्वचेसाठी उत्तम नैसर्गिक स्क्रब आहे. त्यात मृत पेशी काढून टाकून, मुरुमे कमी करण्याची क्षमता आहे.
-
४. काकडी काकडीमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा थंड होते, हायड्रेट होते आणि ताजेपणा जाणवतो.
-
५. कोरफड कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देतो, काळेपणा कमी करतो आणि त्वचा मृदू व निरोगी ठेवतो.
-
६. गुलाबपाणी गुलाबपाणी चेहऱ्याला स्वच्छ करते, ओलावा टिकवून ठेवते आणि त्वचेला नैसर्गिक ताजेपणा देते.
-
७. लिंबाचा रस लिंबामध्ये अॅसिडिक गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करतात. त्याचबरोबर त्वचा उजळवण्यासाठीही उपयोगी असतात.
-
८. सौम्य बाळांचा साबण बाळांच्या त्वचेसाठी बनवलेले साबण सौम्य असतात. त्यांचा वापर चेहरा धुण्यासाठी सुरक्षित असून कोरडेपणा येत नाही.
-
कोणतेही नैसर्गिक घटक वापरण्याआधी त्वचेची चाचणी घेणे गरजेचे आहे. काही वेळा काही घटक त्वचेला हानिकारक ठरू शकतात.
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का