-
उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढल्यामुळे आम्लपित्त, जळजळ आणि अपचनाच्या समस्या सामान्य जाणवतात. जास्त तळलेले पदार्थ, अनियमित खाण्याच्या सवयी आणि डिहायड्रेशनमुळे ही समस्या वाढते. जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर समस्या गंभीर होऊ शकते. अशावेळी औषधांशिवाय तुम्ही स्वयंपाकघरातील काही घरगुती उपाय करुन आराम मिळवू शकता.
-
जर तुम्हालाही उन्हाळ्यात वारंवार अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर काळजी करू नका. काही घरगुती उपायांमुळे तुम्हाला अॅसिडिटीपासून काही वेळातच आराम मिळू शकता. उन्हाळ्यात अॅसिडिटी दूर ठेवण्यास मदत करणारे पुढील ५ सोपे उपाय जाणून घ्या.
-
ताक : ताक हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे जे आतड्यांचे आरोग्य सुधारते. त्यात थोडे भाजलेले जिरे आणि काळे मीठ मिसळून प्यायल्याने अॅसिडिटीपासून आराम मिळतो. हे शरीराला थंड ठेवते आणि उन्हाळ्यात पचनक्रिया सुधारते. जेवणानंतर एक ग्लास ताक पचनसंस्थेसाठी आश्चर्यकारकपणे काम करते.
-
थंड दूध : जेव्हा जेव्हा तुम्हाला पोटात जळजळ किंवा अॅलसिडिटी जाणवते तेव्हा साखर न घालता थंड दूध पिणे हा एक चांगला उपाय आहे. दुधामध्ये कॅल्शियम असते जे आम्ल निष्क्रिय करण्यास मदत करते. हे पोटाच्या आतील थराला थंड करते आणि त्वरित आराम देते. दूध उकळल्यानंतर ते थंड करावे आणि त्यात कोणतेही चव किंवा मसाले घालू नका.
-
नारळ पाणी : नारळ पाणी शरीराच्या पीएच पातळीला संतुलित करते आणि पोटाला थंड करते. हे एक नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करते जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. दिवसातून एकदा नारळ पाणी प्यायल्याने आम्लपित्त, गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हा एक हलके, हायड्रेटिंग आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे.
-
बडीशेप आणि साखर : पोटातील उष्णता थंड करण्यासाठी बडीशेप खूप प्रभावी आहे. दररोज जेवणानंतर १ चमचा बडीशेप आणि साखर चावल्याने गॅस, छातीत जळजळ आणि आम्लपित्त यापासून त्वरित आराम मिळतो. हे पचन सुधारते आणि तोंडाची दुर्गंधी दूर करते. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने थंडावा मिळतो आणि अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत होते.
-
लिंबू पाणी : लिंबूमध्ये असलेल्या सायट्रिक आम्लाचा शरीरावर अल्कधर्मी प्रभाव पडतो, जो पोटातील आम्लाचे संतुलन राखतो. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि थोडेसे सैंधव मीठ मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि डिहायड्रेशन देखील टाळता येते. उन्हाळ्यात दिवसातून एकदा लिंबू पाणी प्यायल्याने अॅसिडिटी बरी होते.

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’