-
शारीरिक हालचाली कमी होणे: तीव्र उष्णतेमुळे लोक बाहेर जाणे टाळतात, ज्यामुळे हालचाली कमी होतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही.
-
ताण आणि झोपेचा अभाव: उष्णतेचा झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो, ज्यामुळे शरीरात इन्सुलिनची प्रभावीता कमी होऊ शकते.
-
डिहायड्रेशन: उन्हाळ्यात शरीराला जास्त घाम येतो, ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तातील साखर घट्ट होऊ शकते आणि तिची पातळी वाढू शकते.
-
अनियमित खाण्याच्या सवयी : उन्हाळ्यात भूक कमी लागते आणि लोक कधीकधी थंड पेये, आईस्क्रीम, पॅकेज्ड ज्यूस सारख्या थंड गोड पदार्थ खाण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते.
-
रक्तातील साखर कशी नियंत्रित करावी: शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी दिवसभरात २.५ ते ३ लिटर पाणी प्या. ताजी फळे, हिरव्या भाज्या, सॅलड आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ असे हलके आणि संतुलित आहार घ्या. साखरयुक्त पेये आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.
-
रक्तातील साखर कशी नियंत्रित करावी : जरी तुम्ही बाहेर जाऊ शकत नसलात तरी घरी योगा, चालणे किंवा स्ट्रेचिंग करा. तुमच्या पातळीची अचूक नोंद ठेवण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा तुमच्या रक्तातील साखरेची तपासणी करा. मानसिक शांती मिळविण्यासाठी ७ ते ८ तास पुरेशी झोप घ्या आणि ध्यानधारणा सारख्या तंत्रांचा वापर करा.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…