-
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर टस्कनीमध्ये सुट्टी घालवताना दिसले, शिरोडकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. ट्रिपमधील काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहे. (स्रोत: Instagram/@namratashirodkar)
-
जर टस्कनी तुमच्या यादीत असेल, तर तेथील भेट देण्यासारख्या ५ ठिकाणांविषयी जाणून घ्या
गॅलेरिया डेगली उफिझी : जगातील महान संग्रहालयांपैकी एक, उफिझीमध्ये इटालियन पुनर्जागरण काळातील कलाकृतींचा उत्कृष्ट संग्रह आहे, ज्यामध्ये बोटीसेली, टिटियन, मायकेलएंजेलो आणि लिओनार्डो दा विंची सारख्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. (स्रोत: इंस्टाग्राम/@namratashirodkar) -
ड्युओमो – कॅटेड्रेल डी सांता मारिया डेल फिओर: कॅथेड्रलचा प्रतिष्ठित घुमट हा प्रसिद्ध पुनर्जागरण वास्तुविशारद ब्रुनेलेस्ची यांनी डिझाइन केलेला एक वास्तुशिल्पीय नमुना होता. फ्लोरेन्सच्या विहंगम दृश्यांसाठी ४६३ पायऱ्या चढून जावे लागते (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)
-
सांता क्रोसची बॅसिलिका: हे फ्लॉरेन्समधील सर्वात श्रीमंत मध्ययुगीन चर्च आहे, या बॅसिलिकामध्ये अनेक कलाकृती आणि मौल्यवान वस्तू आहेत, जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)
-
पियाझ्झेल माइकल एंजेलो : १९ व्या शतकात ज्युसेप्पे पोगी यांनी बांधलेला हा नवशास्त्रीय शैलीचा पियाझ्झा फ्लोरेन्सच्या ऐतिहासिक केंद्राचे काही सर्वोत्तम विहंगम दृश्ये देतो. या प्लाझामध्ये डेव्हिड आणि मेडिसी चॅपलच्या पुतळ्यांसह मायकेल एंजेलोच्या प्रसिद्ध शिल्पांच्या अनेक प्रतिकृती आहेत. (स्रोत: Instagram/@namratashirodkar)
-
पिसाचा झुकता मनोरा: डुओमो स्क्वेअरमधील धार्मिक संकुलाचा एक भाग आहे. हा मनोरा प्रसिद्ध आहे कारण तो दक्षिणेकडे झुकलेला आहे. त्याच्या सात घंटा – प्रत्येक संगीताच्या नोटप्रमाणे – ज्यापैकी सर्वात मोठी, १६५५ मध्ये बनवली गेली होती, तिचे वजन पूर्ण साडेतीन टन होते! (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)

Daily Horoscope : भानू सप्तमीला ‘या’ राशींना मिळेल भरपूर पैसा आणि प्रसिद्धी; तुमच्या नशिबात कसं येणार कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य