-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा, शुभ-अशुभ योगांचाही चांगला-वाईट प्रभाव १२ राशींवर पडतो. तसेच सर्वात कष्टदायी मानली जाणारी शनीची साडेसातीही १२ राशींच्या व्यक्तींवर प्रभाव पाडते.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
जेव्हा शनी एखाद्या राशीच्या दुसऱ्या किंवा १२ व्या घरात असतो, तेव्हा त्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होते. ही साडेसाती अडीच वर्षाच्या तीन टप्प्यांमध्ये असते. म्हणजेच एकूण साडेसात वर्ष असते. म्हणून तिला साडेसाती असे म्हटले जाते.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, २९ मार्च रोजी शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मीन राशीची ही साडेसाती मीन राशीसाठी संघर्षमय असली तरी काही राशींच्या व्यक्तींसाठी ती अत्यंत लाभदायी ठरणार आहे.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
२०२७ पर्यंतचा काळ त्या राशींसाठी सुख, समाधान आणि प्रत्येक कामात यश मिळवून देणारे ठरेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मीन राशीची साडेसाती वृषभ राशीसाठी लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या आर्थिक आणि भौतिक सुखात वाढ होईल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मीन राशीतील शनी मकर राशीसाठी लाभदायी असेल. हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मिथुन राशीच्या व्यक्तींनाही मीन राशीतील शनीचे अनुभवता येतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…