-
फॅशन बहुतेकदा आपल्या कपड्यांच्या निवडीवर अवलंबून असते; परंतु कधी कधी फॅशनच्या नादात घातलेल्या कपड्यांमुळे आपल्या शरीराचे नुकसान होऊ शकते.(फोटो सौजन्य: Freepik)
-
जेव्हा आपण खूप घट्ट कपडे घालतो तेव्हा आपले शरीर अनेक प्रकारे प्रतिक्रिया देते, असे डॉ. सिंघला म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्वचेची जळजळ : घट्ट कपडे त्वचेवर घर्षण निर्माण करू शकतात, ज्यामुळे जळजळ, लालसरपणा व पुरळदेखील येऊ शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
नसांचे आकुंचन : घड्ड कपड्यांमुळे नसांचे आकुंचन हा एक सामान्य दुष्परिणाम आहे. त्यामुळे सुन्नपणा, मुंग्या येणे किंवा वेदनादेखील होऊ शकतात. कालांतराने हे नसांचे आकुंचन आणखी वाढू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
श्वास घेण्यास समस्या : छाती किंवा पोटाभोवती घट्ट कपडे घातल्याने हालचाल करण्यास अडचण येऊ शकते, ज्यामुळे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो. त्याव्यतिरिक्त थकवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
घट्ट कपडे घालण्याचे अल्पकालीन परिणाम व्यवस्थापित करता येऊ शकतात, असे वाटत असले तरी दीर्घकालीन वापराचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. डॉ. सिंघला कालांतराने विकसित होणारे आरोग्याचे अनेक धोके दाखवून देतात. (फोटो सौजन्य: Freepik) -
गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या : पोटाभोवती सतत दाब राहिल्याने अॅसिड रिफ्लक्स, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) व गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) यांसारखे आजार वाढू शकतात किंवा अगदी सुरूही होऊ शकतात. घट्ट कपडे घातल्याने पोटाचा दाब वाढतो आणि पोटातील अॅसिड वरच्या दिशेने ढकलले जाऊन अस्वस्थता निर्माण होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
संसर्गाचा धोक वृद्धिंगत : महिलांच्या विशेषतः मांडीच्या भागात ओलावा निर्माण करणारे घट्ट कपडे यीस्ट इन्फेक्शनसाठी पूरक वातावरण तयार करू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तीव्र मज्जातंतू वेदना : घट्ट कपड्यांमुळे सतत मज्जातंतू दाबले जात असल्याने कायमची सुन्नता होणे, मुंग्या येणे किंवा अगदी तीव्र वेदनादेखील होऊ शकतात. घट्ट कपडे घालणे बंद केल्यानंतरही ही स्थिती दूर करणे कठीण होऊ शकते.(फोटो सौजन्य: Freepik)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…