-
हिरव्या मिरच्या तुमचे जेवण अधिक चविष्ट बनविणारा पदार्थ म्हणून वापरल्या जातात; परंतु त्याच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे त्या तुमच्या त्वचेसाठीही अनेक फायदे देऊ शकतात.
-
हिरव्या मिरचीचे त्वचेला होणारे १० फायदे पाहूया :
-
मुबलक क जीवनसत्त्व : हिरव्या मिरच्यांत भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व असते, जे कोलेजन उत्पादन वाढवते, त्वचेची लवचिकता राखतो आणि सुरकुत्या कमी करतो.
-
त्वचेवरील जखमा सुधारण्यास मदत : हिरव्या मिरच्यांतील क जीवनसत्त्वामुळे त्वचेवरील जखमा आणि डाग बरे होण्याची प्रक्रिया जलद होते.
-
एक्ने (पुरळ)पासून सुटका: हिरव्या मिरच्यांतील अँटीऑक्सिडन्ट्स त्वचेतील अशुद्धता काढून टाकतात, जळजळ कमी करतात आणि एक्ने (पुरळ) होण्यापासून बचाव करतात.
-
अकाली वृद्धत्व टाळण्यास साह्यभूत : हिरव्या मिरच्यांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे सुरकुत्या आणि इतर वयाशी संबंधित लक्षणे कमी होण्यास मदत मिळते.
-
रक्ताभिसरण सुधारणा : हिरव्या मिरच्या रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचेला एक नैसर्गिक आणि आरोग्यपूर्ण चमक मिळते.
-
त्वचा संक्रमणाशी लढण्याचे सामर्थ्य : हिरव्या मिरच्यांमध्ये जीवाणू आणि बुरशी यांच्याविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेतील संक्रमणांशी लढायला मदत करतात.
-
त्वचारंगात सुधारणा : हिरव्या मिरच्यांतील अँटीऑक्सिडन्ट्स त्वचेवरील रंगद्रव्य कमी करण्यास आणि त्वचेला अधिक एकसारखा आणि उज्ज्वल बनवण्यास मदत करतात.
-
त्वचेला डिटॉक्स करते : हिरव्या मिरच्यांमुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडतात आणि त्यामुळे त्वचा स्वच्छ राहून, तिची कांती सुधारते.
-
त्वचेवरील डागांच्या गडदतेत सुधारणा : हिरव्या मिरच्यांमधील क जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडन्ट्स त्वचेवरील गडद डागांची तीव्रता कमी करतात.
-
त्वचा हायड्रेट करण्यास साह्यभूत : हिरव्या मिरच्यांमुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे त्वचा मऊ व हायड्रेटेड राहते.
-
तुमच्या आहारात हिरव्या मिरच्यांचा समावेश करणे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. मात्र, खूप जास्त प्रमाणात हिरव्या मिरच्या खाल्ल्यास त्यांच्यातील अधिक तिखटतेमुळे संवेदनशील त्वचेची जळजळ होऊ शकते. म्हणून त्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.
-
(फोटो सौजन्य फोटो सौजन्य : पेक्सएल्स, पिंटरेस्ट)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…