-
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते आणि गुरू ग्रहाला देवतांचे गुरू म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात या दोन्ही ग्रहांना शुभ आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे हे ग्रह जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ते पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान, सुख-समृद्धी प्राप्त होते. सध्या सूर्य मेष राशीत विराजमान असून गुरू वृषभ राशीत विराजमान आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या २५ एप्रिल रोजी हे दोन्ही ग्रह अर्धकेंद्र योग निर्माण करत आहेत. दोन्ही ग्रहांच्या या युतीमुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचा फायदा होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असल्याने हा योग निर्माण होतो. ज्याला अर्धकेंद्र योग म्हटले जाते. २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी सूर्य आणि गुरू एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि गुरू या ग्रहांनी निर्माण केलेला अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर असेल. या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा योग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीसाठी देखील हा योग अनेक बदल घडवून आणेल. या काळात मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’