-
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा कोर्स केल्याने तुम्हाला डेटा विश्लेषण, प्रोग्रामिंग व मशीन लर्निंगच्या संकल्पनांची सखोल माहिती मिळते. मग त्या आधारे एआय इंजिनीयर किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून करिअर करता येते.
-
डेटा सायन्स कोर्सद्वारे पायथन, एसक्यूएल व एक्सेल यांसारखे टूल्स वापरून डेटाचे विश्लेषण करता येते. त्यामुळे डेटा अनॅलिस्ट किंवा बिझनेस इंटेलिजन्स अनॅलिस्ट यांसारख्या संधी खुल्या होतात.
-
फॉरेन्सिक सायन्स कोर्समुळे तुम्ही गुन्हेगारी घटनांची तपासणी करू शकता आणि फॉरेन्सिक अॅनालिस्ट म्हणून पोलिस किंवा सरकारी संस्थांमध्ये काम करू शकता.
-
पर्यावरण विज्ञान या कोर्समध्ये तुम्ही पर्यावरणीय समस्यांचे विश्लेषण करू शकता आणि पर्यावरण सल्लागार म्हणून काम करू शकता.
-
गेम डेव्हलपमेंट कोर्सद्वारे ‘युनिटी’ वापरून तुम्ही मोबाईल किंवा पीसीसाठी खेळ तयार करू शकता.
-
ग्राफिक डिझायनिंग शिकल्यास अडॉबी फोटोशॉप व इलुस्ट्रेटर यांसारखे सॉफ्टवेअर्स वापरून तुम्ही आकर्षक डिझाइन्स तयार करू शकता.
-
योगा आणि न्यूट्रिशन कोर्समुळे तुम्ही आरोग्य सल्लागार किंवा योगा प्रशिक्षक म्हणून लोकांना आरोग्य मार्गदर्शन करू शकता.
-
क्लिनिकल रिसर्च कोर्स तुम्हाला वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात तयार करतो, जिथे तुम्ही क्लिनिकल ट्रायल्समध्ये सहभागी होऊ शकता.
-
बायोटेक्नोलॉजी कोर्समुळे तुम्ही जैविक प्रयोगशाळांमध्ये संशोधन करण्याचे कौशल्य मिळवू शकता आणि रिसर्च असिस्टंट किंवा बायोटेक्नोलॉजिस्ट म्हणून काम करू शकता.
-
वेब डेव्हलपमेंट शिकल्यास तुम्ही एचटीएमएल, सीएसएस, जावास्क्रिप्ट यांसारख्या भाषा वापरून वेबसाइट्स तयार करू शकता. त्या ज्ञानाच्या बळावर तुम्ही फ्रंटएंड किंवा फुल-स्टॅक डेव्हलपर होऊ शकता.
-
सायबर सिक्युरिटी कोर्सद्वारे नेटवर्क सिक्युरिटी आणि एथिकल हॅकिंग शिकून तुम्ही सायबर सिक्युरिटी अनॅलिस्ट म्हणून काम करू शकता.
-
रोबोटिक्स या कोर्समध्ये तुम्ही मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग व सर्किट डिझाइन शिकून रोबोटिक्स इंजिनीयर म्हणून करिअर करू शकता.
(Image Credits: Pexels)