-
केवळ महिलाच नाही तर आजकाल पुरुषही त्यांच्या दिसण्याबद्दल आणि वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरूक झाले आहेत. अशा परिस्थितीत, केवळ चेहऱ्याची काळजी घेणेच नव्हे तर पायांची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे बनते. पण दरवेळी पेडिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्ये जाणे म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवण्यासारखे वाटू शकते.
-
पण काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन घरच्या घरी स्वतः पेडिक्युअर करू शकता. घरी पेडिक्युअर करणे कठीण किंवा महाग नाही. थोडा वेळ आणि थोडे प्रयत्न करून, तुम्ही तुमच्या पायांना पार्लरसारखी चमक देऊ शकता.
-
पार्लरमध्ये जाण्यापेक्षा आठवड्याच्या शेवटी घरी एक ताजेतवाने फूट स्पा करा. घरी सहजपणे पेडिक्युअर कसे करावे जाणून घ्या.
-
तुमचे पाय कोमट पाण्यात बुडवा.
घरी पेडिक्युअर करण्यासाठी सर्वप्रथम एका टबमध्ये कोमट पाणी घ्या, त्यात लव्हेंडर तेल किंवा ग्रीन टी ऑइलचे काही थेंब मिसळा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही लिंबाचा रस आणि मीठ देखील घालू शकता. त्यात तुमचे पाय १५-२० मिनिटे बुडवा. यामुळे पायांतील थकवा दूर होईल आणि त्वचा मऊ होईल. -
स्क्रबने मृत त्वचा स्वच्छ करा
आता पाय नीट घासून घ्याा, तुम्ही घरी नैसर्गिक स्क्रब बनवू शकता, जसे की, साखर आणि ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण. यामुळे पायांच्या टाचांवर, बोटांवर जमा झालेली मृत त्वचा निघून जाईल आणि पायांना एक नवीन चमक येईल. -
नखं स्वच्छ करुन शेप द्या
पायांच्या सौंदर्यात नखं महत्त्वाची भूमिका बजावतात. स्क्रबिंग केल्यानंतर, नखे ट्रिम करा आणि नेल फाइलरने त्यांना शेप द्या. जर क्युटिकल्स खूप वाढल्या असतील तर त्यांना हळूवारपणे मागे ढकला. -
मॉइश्चरायझर करा
पेडिक्युअरमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मॉइश्चरायझिंग. नखे स्क्रबिंग आणि साफ केल्यानंतर, पायांना चांगल्या दर्जाचे फूट क्रीम किंवा बॉडी लोशन लावा. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि भेगा बऱ्या होऊ लागतात. -
नेलपॉलिश लावा
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही नखांना नेलपॉलिश लावू शकता. यामुळे पायांची बोट आकर्षक दिसतात आणि एक फिनिशिंग टच मिळतो. -
पायांना मालिश करा
शेवटचा टप्पा म्हणजे पायांची मालिश. हे केवळ पायांना आराम देत नाही तर रक्ताभिसरण देखील सुधारते. नारळ तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा कोणत्याही मसाज क्रीमचा वापर करा आणि हलक्या हातांनी मसाज करा. (फोटो- पेक्सेल्स)
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार