-
चांगली झोप केवळ पुढचा दिवस चांगला बनवत नाही तर ती तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल, तर कदाचित तुमच्या रात्रीच्या दिनचर्येत काही बदल करण्याची आवश्यकता असू शकते.
-
आज आपण अशा ७ सोप्या पण प्रभावी टिप्स जाणून घेणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला गाढ आणि शांत झोप मिळेल, तसेच यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशीही उत्साही वाटेल.
-
एका निश्चित वेळी झोपा
तुमच्या शरीराला एक विशिष्ट दिनचर्येची आवश्यकता असते, त्यामुळे दररोज एकाच वेळी झोपायला जाणे आणि उठणे तुमच्या शरीराचे अंतर्गत घड्याळ सेट करते, ज्यामुळे तुम्ही कुठल्याही दिवशी वेळेवर झोपू शकता. -
स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा
झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरल्याने झोपेच्या संप्रेरकावर, मेलाटोनिनवर परिणाम होतो. झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणे किंवा डायरी लिहिणे तुमच्या झोपेसाठी चांगले ठरू शकते. -
आरामदायी वातावरण तयार करा
चांगल्या झोपेसाठी दिवे मंद करून, सुगंधित मेणबत्त्या पेटवून किंवा मंद संगीत ऐकून शांत आणि आरामदायी वातावरण तयार करा. या प्रकारचे वातावरण तुमच्या मेंदूला विश्रांती घेण्यासाठी आणि झोपण्याची वेळ झाल्याबद्दल सूचित करते. -
दिवसा जास्त झोपू नका
कमी आणि मर्यादित कालावधीसाठी पॉवर नॅप्स तुम्हाला दिवसा ताजेतवाने करू शकतात, परंतु जास्त वेळ किंवा अवेळी झोपल्याने रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या दिवसाच्या झोपेचे योग्य नियोजन करा. -
झोपेची डायरी ठेवा
तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा, जेवण आणि मनःस्थिती यासंबंधीच्या नोंदी ठेवा. तुमच्या झोपेवर काय परिणाम होतोय हे समजून घेण्यास हे तुम्हाला मदत करेल. -
कॅफिनपासून दूर रहा
कॅफिन तुमची एकाग्रता आणि ऊर्जा वाढवू शकते, पण हे झोपेच्या ६ ते ८ तास आधी घेतल्यास त्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. म्हणून कॅफिन असलेल्या गोष्टींपासून दूर रहा (कॉफी, एनर्जी ड्रिंक्स, चहा इ.).

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”