-
काळ्या व जाड भुवया तुमच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे कुठेही जायचे असेल, तर सगळ्यात आधी आपण पार्लरमध्ये आयब्रो करायला जातो; जेणेकरून नेहमीपेक्षा तुमचा चेहरा थोडा वेगळा दिसेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच आपल्यातील अनेकांना भुवया बारीक दिसलेल्या अजिबात आवडत नाहीत. तर, नेमका यावर उपाय करायचा, असा तुम्हीदेखील विचार करीत असाल तर…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर नैसर्गिक पद्धतीने भुवया काळ्या व जाड करण्याकरता काही घरगुती उपाय तुमच्यासाठी आम्ही या बातमीतून घेऊन आलो आहोत…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
आयब्रो पेन्सिलचा योग्य वापर करा – आयब्रो जाड व काळे दिसण्यासाठी, आयब्रो पेन्सिलचा योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. आयब्रोच्या रिकाम्या जागी पेन्सिलने रंग भरा. त्यामुळे आयब्रो जाड आणि काळे दिसतील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लक्षात ठेवा की, पेन्सिलचा रंग तुमच्या आयब्रोच्या केसांच्या रंगाशी जुळला पाहिजे; जेणेकरून लूक नैसर्गिक दिसेल.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
आयब्रो जेल वापरा – आयब्रो जेलने तुम्ही तुमच्या आयब्रोला जाड लूक देऊ शकता. त्यामुळे तुमचे केस एकाच ठिकाणी (सेट होतात) राहतात. तसेच आयब्रो जेल तुम्ही कधीही वापरून पाहू शकता आणि एक वेगळा लूक मिळवू शकता.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
तेलाचा वापर करा – भुवया जाड आणि काळ्या दिसण्यासाठी, त्यांच्या केसांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. एरंडेल तेल, नारळ तेल किंवा आवळा तेलाने नियमितपणे भुवयांना मालिश करा. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि तुमच्या भुवया दाट व जाड दिसू लागतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पेट्रोलियम जेली उपयुक्त ठरू शकते – पेट्रोलियम जेली हा एक जुना उपाय आहे. पेट्रोलियम जेली तुमच्या भुवयांच्या त्वचेला मॉइश्चराईझ आणि पोषण देण्यास मदत करते. त्यामुळे भुवयांचे केस तुटणे कमी होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पेट्रोलियम जेली बोटांवर घेऊन, त्याने भुवयांवर मालिश करा आणि रात्रभर ते तसेच राहू द्या. काही महिने वापरल्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतील. पण, जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर हा उपाय टाळा. (फोटो सौजन्य: @Freepik)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच