-
उन्हाळा आला की कैरी, खरबूज आणि कलिंगड यांसारख्या रसाळ आणि स्वादिष्ट हंगामी फळांचा आस्वाद घेण्यास सुरुवात होते. (Photo : Pexels)
-
उन्हाळ्याच्या दिवसात स्वादिष्ट वाटणारे कलिंगड शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवतातच, पण त्यासह त्याचे असंख्य आरोग्यदायी फायदेही आहेत. (Photo : Pexels)
-
गोड, रसाळ, पौष्टिक असलेले कलिंगड हे फळ तुमच्या उन्हाळी फराळाचा एक भाग असणे अत्यंत आवश्यक आहे. (Photo : Pexels)
-
कलिंगडामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते, जे व्हिटॅमिन सी, ए, बी6 आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, फोलेट आणि कॅल्शियम यांसारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहे,” असे आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार सांगतात. (Photo : Pexels)
-
कलिंगडामुळे तहान कमी लागते आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
कलिंगडाच्या सेवनाने थकवा कमी होतो आणि आपल्याला फ्रेश वाटते. (Photo : Pexels) -
कलिंगडामुळे छातीतील जळजळ दूर करण्यास मदत होते. तसेच मूत्राशयाचा संसर्ग दूर करण्यास मदत होते. (Photo : Pexels)
-
कलिंगडाच्या बिया
केवळ कलिंगडामधील गरच नाही तर कलिंगडाच्या बियासुद्धा फायदेशीर आहेत. त्या थंड आणि पौष्टिक स्वरूपाच्या असतात. “बियांच्या तेलात लिनोलिक अॅसिड, ओलेइक अॅसिड, पामिटिक आणि स्टीरिक अॅसिडचे ग्लिसराइड असतात,” असे डॉ. भावसार पुढे सांगतात. (Photo : Pexels) -
कलिंगड कसे खावे?
तज्ज्ञांनी कलिंगडाचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला दिला. त्या सांगतात, “कलिंगड कमी प्रमाणात खा, ते जास्त प्रमाणात कधीही खाऊ नका अन्यथा तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटू शकते, गॅस होऊ शकतो आणि कदाचित पोटदुखीदेखील होऊ शकते.” याशिवाय हे फळ जेवणाबरोबर खाऊ नये. (Photo : Pexels) -
कलिंगड खाण्याची योग्य वेळ
आयुर्वेदानुसार, कलिंगड खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्ही नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणादरम्यान खाऊ शकता. याशिवाय कलिंगड तुम्ही संध्याकाळी ५ वाजण्यापूर्वी खाऊ शकता. फक्त कलिंगड रात्री किंवा रात्रीच्या जेवणाबरोबर खाऊ नका. (Photo : Pexels)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच