-
ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला मायावी ग्रह म्हटलं जातं. त्यामुळे राहूच्या राशी परिवर्तनाचा किंवा नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींना मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीनंतर राहू ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अधिक काळ लागतो. राहू जवळपास १८ महिने एका राशीत राहतो. तसेच तो वक्री चाल चालतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, २०२४ मध्ये राहू मीन राशीत विराजमान होता. आता २०२५ तो कुंभ राशीत राशी परिवर्तन करील. राहूच्या कुंभ राशीतील राशी परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, राहू १८ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार असून तो ५ डिसेंबर २०२६ पर्यंत या राशीत राहील. राहूचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे राशी परिवर्तन लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचा कुंभ राशीतील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवने रचला इतिहास! ३५ चेंडूत झळकावलं वादळी शतक