-
बीअरसारख्या अल्कोहोलिक पेयाचा फक्त पिण्यासाठीच नाही, तर अंघोळीसाठी वापर करण्याचे अनेक फायदे आहेत.
बीअर बाथ तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या अपेक्षेपेक्षा नक्कीच जास्त फायदेशीर ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik) -
बीअरमध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे बीअर बाथमुळे त्वचेला अनेक फायदे मिळू शकतात. हॉप्स हा एक प्रमुख घटक आहे, त्यात दाहकविरोधी आणि जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो, जो त्वचेला नीट करू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्याव्यतिरिक्त बीअरमधील यीस्टमध्ये व्हिटॅमिन बी असते, जे तुमची त्वचा गुळगुळीत करू शकते. “बीअर एक नैसर्गिक एक्सफोलिएटरदेखील आहे, जे मृत त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात,” असे केअर हॉस्पिटल्सच्या सल्लागार व त्वचारोगतज्ज्ञ डॉ. स्वप्ना प्रिया म्हणतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बीअर बाथ तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि तुमच्या शरीरातील कोणत्याही सांधेदुखीला आराम देण्यासाठीही ओळखला जातो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“बीअरमध्ये असे अनेक घटक असतात, जे बीअर जास्त प्रमाणात सेवन न केल्यास संभाव्य आरोग्यदाियी फायदे देऊ शकतात,” असे डॉ. प्रिया म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
यीस्ट आणि हॉप्स वनस्पतींसह बीअरमध्ये पॉलीफेनॉलदेखील असतात, जे अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि त्यामुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्सपासून मुक्त होण्यास आपल्याला मदत मिळते, ज्यामुळे आपल्या शरीरातील पेशींचे नुकसान टाळता येते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“बीअर बाथमुळे ताण कमी होण्यास आणि आराम मिळण्यास मदत होते. हॉप्स आणि माल्टच्या सुखदायक सुगंधासह गरम पाणी शांत वातावरण तयार करू शकते, ज्यामुळे ताण कमी होण्यास आणि विश्रांती मिळणयासाठी फायदा होतो.” असे डॉ. प्रिया म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“मानवी शरीर नैसर्गिकरीत्या यकृत, मूत्रपिंड व घामाच्या ग्रंथींद्वारे स्वतःला डिटॉक्सिफाय करते आणि बीअर बाथ ही एक चांगली डिटॉक्स पद्धत आहे. या कल्पनेला समर्थन देणारे कोणतेही विश्वसनीय संशोधन पुरावे नाहीत. हायड्रेटेड राहून, पौष्टिक आहार घेऊन आणि नियमित व्यायाम करूनच शरीर योग्यरीत्या डिटॉक्स करता येते,” असे डॉ. प्रिया म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्वचेची काळजी घेण्याची किंवा ताण व्यवस्थापनाची ही एक प्रभावी पद्धत मानली जाऊ नये. डॉ. प्रिया यांनी सांगितले की, बीअर बाथ काही प्रमाणात ताण कमी करण्यास मदत करू शकते आणि त्याचे काही वरवरचे त्वचेचे फायदे असू शकतात, पण, या पद्धतींवर अवलंबून राहू नये.” (फोटो सौजन्य: Freepik)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल