-
डाळ भात हा भारतीयांचा आवडता मेन्यू आहे. हे पदार्थ बनवायला सोपे व चवीला स्वादिष्ट आहेत, पण त्याबरोबरच ते संतुलित आहारासाठी महत्त्वाचा घटक मानले जातात. यामध्ये प्रोटिन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. (Photo : Pexels)
-
खरं तर तांदूळ आणि डाळीचे सर्व प्रकार समान पौष्टिक फायदे देत नाही. जेव्हा आपण योग्य डाळ भात एकत्र खातो तेव्हा त्याचे पौष्टिक मूल्य वाढते, जे आपल्याला आवश्यक पोषक तत्वे व ऊर्जासुद्धा पुरवतात. (Photo : Pexels)
-
हंग्री कोआला येथील वरिष्ठ न्युट्रिशनिस्ट इप्सिता चक्रवर्ती सांगतात, “डाळ भातातील पौष्टिकता टिकवून ठेवण्यासाठी स्वयंपाक करण्याची पद्धत खूप महत्त्वाची भूमिका बजावते. डाळ आणि तांदूळ जास्त शिजवल्याने बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सीसारख्या पाण्यात विरघळणाऱ्या पौष्टिक घटकांचे नुकसान होऊ शकते. तांदूळ उकळल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकल्याने पोषक घटक नष्ट होतात. त्यासाठीप्रेशर कुकर हा एक चांगला पर्याय आहे. प्रेशर कुकरमध्ये कमी वेळात आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून अधिक पोषक तत्त्वे टिकवून ठेवता येतात.” (Photo : Pexels)
-
चक्रवर्ती पुढे सांगतात की, तांदूळ किंवा डाळ जास्त प्रमाणात धुतल्याने आवश्यक व्हिटॅमिन बी नष्ट होऊ शकतात, म्हणून एक दोन वेळा डाळ तांदूळ धुणे पुरेसे आहे. (Photo : Pexels)
-
डाळी आणि पॉलिश न केलेले तांदूळ निवडल्याने फायबर आणि पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त राहते. इडली किंवा डोसासारख्या आंबवलेल्या पदार्थांमध्ये डाळी पोषक तत्त्वे टिकवून ठेवतात आणि पचनक्षमता वाढवतात. (Photo : Pexels)
-
डाळ भात बनवताना त्यात थोड्या प्रमाणात तूप किंवा तेल घातल्याने आरोग्याला धोका निर्माण होत नाही, उलट व्हिटॅमिन ए आणि डीसारखे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स शोषून घेण्यास मदत होते. (Photo : Pexels)
-
डाळ भात हा जेवणातील महत्त्वाचा पदार्थ आहे. हे चुकीच्या पद्धतीने बनवल्याने किंवा एकत्र सेवन केल्याने त्याचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते. (Photo : Pexels)
-
चक्रवर्ती सांगतात, “फक्त पॉलिश केलेल्या पांढऱ्या तांदळावर अवलंबून न राहता फायबर आणि अँटिऑक्सिडंट्ससाठी ब्राउन, लाल किंवा काळ्या तांदळाचा आहारात समावेश करा. डाळीचे पौष्टिक प्रमाण वाढवण्यासाठी भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पतींचा समावेश करा. प्रोबायोटिक्ससाठी दही किंवा सॅलेडचे त्याबरोबर सेवन करा.” (Photo : Pexels)
-
मीठ आणि तुपाचे मर्यादित सेवन करा, चवीसाठी हळद किंवा जिरेसारखे मसाले वापरा. वरण भातातील पोषक तत्त्वे टिकवून ठेवण्यासाठी पाणी काढू नका आणि प्रोटिन्स आणि कार्बोहायड्रेट्सचे नीट संतुलन राखण्यासाठी डाळ आणि तांदळाचे संतुलित प्रमाण २:१ ठेवा. चक्रवर्ती सांगतात, विविध पोषक घटकांचे सेवन करण्यासाठी डाळ आणि तांदळाचे प्रकार बदलत राहा. (Photo : Freepik)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल