-
कंगना राणौत ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
-
दसऱ्याच्या मुहूर्तावर कंगना रणौतने शस्त्रपूजनाचे काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांना हे फोटो खूपच आवडले आहेत.
-
कंगना राणौतने तिच्या मनाली येथील घरात शस्त्रपूजन केले.
-
यावेळी कंगनाने तिच्या सुरक्षा जवानांच्या शस्त्रांची पूजा केली आहे.
-
या फोटोच्या कॅप्शनमध्ये कंगनाने म्हटलंय, तुम्ही धर्माने कोणीही असाल, पण जे आपल्या कर्माने क्षत्रिय आहेत, त्यांना मला विजयादशमीच्या निमित्ताने हाच संदेश द्यायचा आहे, ‘विजयीभव!’
-
कंगनाचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
भारत सरकारकडून कंगना राणौतला वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
-
तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसेल. (सर्व फोटो : सोशल मीडिया/कंगना रणौत)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी