-
२०२२ सालातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
-
हे ग्रहण भारताच्या काही भागात खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे.
-
वैदिक पंचांगानुसार, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होत आहे.
-
दिवाळीच्या दुसर्या दिवशी हे ग्रहण होणार असल्याने त्याचा सुतक काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
-
२४ ऑक्टोबर दिवाळीच्या रात्री २ वाजून ३० मिनिटांनी वाजता सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे. हा सुतक काळ ग्रहण संपेपर्यंत राहील.
-
ग्रहणाचा एकूण कालावधी ४० मिनिटे आहे.
-
देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सूर्यग्रहणाची वेळ वेगवेगळी असेल आणि मोक्षही सूर्यास्ताच्या स्थानिक वेळेनुसार असेल.
-
या सूर्यग्रहणामुळे वेगवेगळ्या राशीच्या लोकांच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव पाहायला मिळू शकतो.
-
चला जाणून घेऊया सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर काय परिणाम होईल.
-
ज्योतिषांच्या मते हे सूर्यग्रहण तूळ राशीत होणार आहे. त्यामुळे तूळ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अशुभ असू शकतो.
-
या लोकांना शारीरिक अथवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच या काळात त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (फोटो : Pexels/Pixabay)
Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…