-
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री सुरू होते आणि नवमी तिथीला समाप्त होते. नवरात्रीचे हे 9 दिवस अतिशय पवित्र आणि सुख-समृद्धी देतात असे मानले जाते.
-
यंदा १५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होणार असून महानवमी 23 ऑक्टोबरला साजरी होणार आहे.
-
ज्योतिष शास्त्रानुसार, या वर्षी नवरात्रीची सुरुवात अतिशय शुभ संयोगाने होत आहे, त्यामुळे हे 9 दिवस काही राशींना खूप शुभ परिणाम देऊ शकतात.
-
यंदा नवरात्रीमध्ये बुधादित्य योग, शश योग आणि भद्रा राजयोग तयार होत आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींना हे योग लाभदायक ठरू शकतात.
-
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना नवरात्रीच्या काळात घडणाऱ्या शुभ योगायोगाचा खूप फायदा होऊ शकतो. धनलाभ होण्याची शक्यता असून उत्पन्नात वाढ होऊ शकते.
-
तब्येत सुधारू शकते. नोकरीत उच्च पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रगती होऊ शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. समाजात मान-सन्मान वाढेल.
-
कर्क: नवरात्रीच्या काळात घडणाऱ्या दुर्मिळ योगायोगांमुळे कर्क राशीच्या लोकांचे परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होऊ शकते.
-
हातातील कामात यश मिळू शकते. आर्थिक संकट दूर होऊन उत्पन्न वाढण्याची संभावना आहे.
-
तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी यंदाची नवरात्र खूप शुभ ठरण्याची संभावना आहे. या लोकांचे नशीब चमकू शकते. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढण्याचे योग आहेत.
-
तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होतात ती सुवर्णसंधी या काळात मिळू शकते. येणारे अडथळे दूर करून यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकता.
-
मकर : मकर राशीच्या लोकांसाठी यंदाची नवरात्र शुभ फळ देऊ शकते. जीवनातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती होऊ शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?