-
हिंदू पौराणिक कथांमध्ये नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
-
नवरात्र म्हणजे नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रुपांची मनोभावे केलेली आराधना, गरब्याची धमाल, आणि नऊ रंग. या रंगांना अनुसरून महिला नऊ दिवस सुंदर पेहराव करतात.
-
या नऊ दिवसांनुसार रंग परिधान केल्याने एकनिष्ठ आणि शांत वाटते, असे म्हटले जाते. आज आपण या रंगांचे महत्त्व आणि अर्थ जाणून घेणार आहोत.
-
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, हिंदू देवी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. पर्वतांची कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीला पार्वती देखील म्हणतात. यंदाच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात नारिंगी रंगाने झाली आहे. हा रंग ऊर्जा आणि आनंद दर्शवतो.
-
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा रंग पांढरा आहे. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. पांढरा रंग शुद्धता, शांती आणि ध्यान दर्शवतो. माता ब्रह्मचारिणी देखील पांढरा पोशाख परिधान करते. ती निष्ठा आणि शहाणपणा दर्शवते. ही देवी प्रेमाचे प्रतीक आहे.
-
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा रंग लाल आहे. हा रंग सौंदर्य आणि निर्भयता दर्शवतो. या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. अशी मान्यता आह की ही देवी लोकांना त्यांच्या शौर्य, कृपा आणि धैर्याचे प्रतिफळ देते.
-
नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा रंग निळा आहे. हा रंग चांगले आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला आठ हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा देवी असेही म्हणतात.
-
पाचव्या दिवसाचा रंग पिवळा आहे. हा रंग म्हणजे आनंद आणि तेज. या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. तिला भगवान कार्तिकेयची माता म्हणून देखील ओळखले जाते.
-
नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचा रंग हिरवा आहे. हिरवा रंग नवीन सुरुवात आणि वाढ दर्शवतो. या दिवशी देवी कात्यायनीची पूजा करतात. तिला अत्याचारी राक्षस महिषासुराचा वध करणारी देवी म्हणून पाहिले जाते.
-
सातव्या दिवसाचा रंग राखाडी आहे, जो परिवर्तनाची ताकद दर्शवितो. या दिवशी कालरात्रीची पूजा करतात. ही देवी सर्व राक्षस, नकारात्मक ऊर्जा, दुष्ट आत्मे आणि भूत यांचा नाश करणारी आहे असे मानले जाते. आपल्या भक्तांना ती नेहमी शुभ फल प्रदान करते या श्रद्धेमुळे देवीला शुभंकारी म्हणूनही ओळखले जाते.
-
नवरात्रीचा आठवा दिवस देवीचा अवतार मानल्या जाणाऱ्या लहान मुलींना खाऊ घालून साजरा केला जातो. या दिवसाचा रंग जांभळा आहे. हा रंग बुद्धी आणि शांतीची शक्ती दर्शवतो. या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या देवीकडे आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे. या देवीची उपासना करणार्याला जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात.
-
नववा दिवस हा नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या दिवसाला नवमी म्हणतात. या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. मोरपंखी हिरवा हा या दिवसाचा रंग आहे. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे. त्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते. शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Freepik)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन