-
१५ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. नवरात्रीत अनेक भाविक उपवास करतात.
-
काहीजण नऊ दिवस केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काहीजण दिवसभर उपाशी राहून रात्री एक वेळेस जेवण करतात.
-
नवरात्रीत उपवास करणं हे शुभ मानलं जातं. मात्र यामुळे अनेकांना अॅसिडिटीची समस्याही उद्भवू शकते.
-
यासाठी काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
-
तुमच्या दिवसाची सुरुवात चहाने नाही तर सफरचंदाने करा. यामुळे तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही आणि तुम्हाला ऊर्जा मिळेल.
-
उपवासात लोक फार कमी पाणी पितात. यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. उपवासाच्या दिवशी १-२ नारळांचे पाणी प्यावे, ते गॅस आणि अॅसिडिटी दूर करेल.
-
अनेकजण उपवासामध्ये दुधी भोपळा खातात. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होईल. तुम्ही याची खीर बनवून खाऊ शकता.
-
उपवासात तुम्ही वरीच्या तांदळाची खिचडी खाऊ शकता. यामुळे गॅसही होणार नाही आणि पोटही सहज भरेल.
-
उपवासाच्या दिवशी दहीचे अवश्य सेवन करावे. यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होणार नाही. तुम्ही दह्यात बटाटा घालूनसुद्धा खाऊ शकता.
-
गॅस किंवा अॅसिडिटी होत आहे असे वाटत असेल तर ते टाळण्यासाठी अर्धा ग्लास थंड दूध प्या. यामुळे अॅसिडिटीपासून झटपट आराम मिळेल.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
-
सर्व फोटो : freepik

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश