-
चकल्या हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतात. दिवाळीच्या फराळामध्ये चकल्या आवर्जून बनवल्या जातात. (Photo : Instagram, social media)
-
अनेक जणांची तक्रार असते की खूप प्रयत्न करुनही चकल्या कुरकुरीत होत नाही. टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत चकल्या बनवण्यासाठी खास टिप्स आणि सोपी रेसिपी सुद्धा सांगत आहोत. (Photo : Instagram, social media)
-
या टिप्सच्या मदतीने तुम्ही खुसखुशीत चकल्या बनवू शकता आणि कुरकरीत चकल्यांचा आस्वाद घेऊ शकता. (Photo : Instagram, social media)
-
साहित्य – तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मूगाची डाळ, तिखट, हळद, ओवा, पांढरे, तीळ, चकली मसाला, तेल, मीठ (Photo : Instagram, social media)
-
तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मूगाची डाळ मंद आचेवर भाजून घ्या.सर्व धान्य एकत्र करुन जाडसर पीठ दळून आणा. (Photo : Instagram, social media)
-
एका भांड्यात पाणी उकळून घ्यावे. दळून आणलेल्या पीठात हळद, ओवा, पांढरे तीळ, मीठ, चकली मसाला तिखट आणि मोहन तेल टाका. (Photo : Instagram, social media)
-
गरम पाण्याने हे पीठ मळून घ्या.हे मळलेलं पीठ चकलीच्या सांच्यात भरा आणि चकल्या पाडा.मंद आचेवर चकल्या तळून घ्या (Photo : Instagram, social media)
-
धान्य चांगले भाजले नाही तर चकल्या कुरकुरीत होत नाही. त्यामुळे धान्य चांगले भाजावे. (Photo : Instagram, social media)
-
चकलीत मोहन तेल योग्य प्रमाणात टाकावं. तेलाचं प्रमाण जास्त झाल्याने चकल्या कुरकुरीत होत नाही आणि चकल्या नेहमी मंद आचेवर तळाव्यात. (Photo : Instagram, social media)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल