-
वसुबारस सणापासून दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. दिवाळी म्हटलं की दिवे, मिठाई-फराळ, रंगीत आकाशकंदील आणि प्रचंड उत्साह-आनंद नजरेसमोर येतो. भारतातील सर्व बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलून गेल्या आहेत. विविध प्रदेशांमध्ये दिवाळीची तयारी कशी सुरू आहे, हे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहूया. गुरुवारी हुबळीमध्ये दिवाळीसाठी ‘आकाश बुट्टी आणि दिया’ खरेदीकरिता लोकांनी गर्दी केलेली दिसते. (पीटीआय फोटो)
-
जम्मू : एक महिला झेंडूची फुले गोळा करत आहे. भारतामध्ये दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना अधिक महत्त्व असते. झेंडूची फुले सजावटीसाठी वापरतात, लक्ष्मीपूजनामध्ये याचा वापर करतात. (एपी फोटो/चन्नी आनंद)
-
दीपावलीसाठी लक्ष्मी रोडला जोडणारे सर्व रस्ते उजळून निघालेले आहेत (एक्स्प्रेस फोटो अरुल होरायझन)
-
अहमदाबाद: दिवाळी उत्सवासाठी मंदिरामध्ये रांगोळी साकारताना पुजारी (पीटीआय फोटो)
-
गौतम बुद्ध नगर: फूटपाथवर एक विक्रेती हार गुंफण्यात मग्न आहे (पीटीआय फोटो/विजय वर्मा)
-
मुंबई : शिवाजी पार्कमध्ये दिवाळीची सजावट. (प्रदीप दास : एक्सप्रेस फोटो)
-
पुणे : दिवाळीसाठी फटाके घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)
-
सोमवारी नवी दिल्लीत दिवाळीच्या आदल्या दिवशी फुललेली बाजारपेठ. (एक्स्प्रेस फोटो : प्रवीण खन्ना)
-
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”