-
दिवाळी म्हटलं की, उत्साह आणि आनंदाचा सण. पारंपरिक पोशाख करून सुंदर दिसण्यासाठी अनेकजणी प्रयत्न करत असतात. ‘पारंपरिक’ वेशभूषेतही ‘आधुनिक दिसावे, असे अनेकजणींना वाटत असते. हा दोन्ही लूकचा मेळ कसा घालाल ? तुम्हालाही दिवाळीमध्ये पारंपरिक लुकसोबत फॅशनेबल आणि स्टायलिश दिसायचे असेल, तर तुम्ही या अभिनेत्रींकडून स्टाईल टीप्स घेऊ शकता.
-
जान्हवी कपूर
या छायाचित्रात जान्हवी कपूरने भरजरी बॉर्डर असलेली टिश्यू साडी नेसली आहे. त्याला शोभेल असा सिव्हलेस ब्लाउज घातला आहे. त्यावरती सौम्य ज्वेलरीही तिने घातली आहे. भडक लूक पेक्षा हा सौम्य लूक पारंपरिकतेला नाविन्याची जोड देतोय.
(फोटो स्रोत: @janhvikapoor/instagram) -
कतरिना कैफ
या फोटोमध्ये कतरिना कैफने फिकट गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. या एम्ब्रॉयडरी सूटमध्ये एथनिक लूक खूपच सुंदर दिसत आहे.
(फोटो स्रोत: @katrinakaif/instagram) -
अनन्या पांडे
या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अनन्या पांडे खूपच सुंदर दिसत आहे. तिने मॅचिंग स्कर्ट आणि दुपट्ट्यासह पेस्टल सिक्विन ब्लाउज घातला आहे.
(फोटो स्रोत: @ananyapanday/instagram) -
सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हाने नेव्ही ब्लू रंगाचा जरी वर्क सलवार सूट परिधान केला आहे. केस मोकळे ठेवल्याने ती अजूनच सुंदर दिसत आहे. गळ्यातही साधी ज्वेलरीही तिचा लूक पूर्ण करत आहे. (फोटो स्रोत: @aslisona/instagram) -
क्रिती सॅनन
या फोटोमध्ये क्रिती सेननने गुलाबी आणि केशरी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. फुल स्लीव्हज आणि चायनीज कॉलरसह हा ड्रेस एकदम रॉयल दिसतो आहे.
(फोटो स्त्रोत: @kritisanon/instagram) -
सारा अली खान
सॉफ्ट लाइट पिंक कलरची कुर्ती आणि लाँग जॅकेटआणि पॅन्ट या पोषाखामुळे वेस्टर्न मिक्स आउटफिटमध्ये खूप स्टायलिश दिसाल.
(फोटो स्रोत: @saraalikhan95/instagram) -
श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूर केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दिवाळीच्या निमित्ताने हा लेहेंगा तुमच्या पारंपरिक लूकमध्ये मोहक ठरू शकतो.
(फोटो स्रोत: @shraddhakapoor/instagram) -
सुहाना खान
सिक्विन बॉर्डर असलेल्या या निळ्या साडीमध्ये सुहाना खान खूपच सुंदर दिसत आहे. हा पोशाख तुम्हालाही ग्लॅमरस लूक देऊ शकतो.
(फोटो स्रोत: @suhanakhan2/instagram) -
आलिया भट्ट
या गुलाबी एम्ब्रॉयडरी पोशाखात आलिया भट्ट हटके दिसत आहे. दिवाळीमध्ये पारंपरिकतेला आधुनिकतेचा साज देणारा हा ड्रेस आहे. (फोटो स्रोत: @aliaabhatt/instagram)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का