-
दिवाळी हा दिव्यांचा, उत्साहाचा सण. हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. भारतभर आज साजऱ्या होणाऱ्या दिवाळीची झलक पाहूया एका क्लिकवर…
वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी येथील बीचवर ‘दिवाळी’ थीमवर वाळूशिल्प साकारले. (पीटीआय फोटो) -
दिवाळीच्या पूर्वसंध्येला गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर रोषणाई करण्यात आली. (पीटीआय फोटो)
-
जम्मू : दिवाळीच्या पूर्वसंध्येला नवीन दिवे खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली. (एपी फोटो/चन्नी आनंद)
-
नागपुरात एका घरी दिवाळीनिमित्त भगवान शंकर आणि पार्वती यांची रांगोळी साकारण्यात आली. (पीटीआय फोटो)
-
अयोध्येतील दीपोत्सव : दिवाळीमध्ये येथील दरम्यान लोक राम की पौरी येथे मातीचे दिवे लावतात. (पीटीआय फोटो)
-
मुंबईत दिवाळीमध्ये लावण्यात येणाऱ्या फटाक्यांनी आकाशही उजळते. (पीटीआय फोटो/ कुणाल पाटील)
-
अयोध्येत दीपोत्सव : दिवाळी उत्सवादरम्यान प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरील चित्ररथ काढलेले दिसतात (पीटीआय फोटो)
-
जबलपूर येथील नर्मदा नदीच्या काठी दिवाळीनिमित्त ‘दीपोत्सव’ कार्यक्रमाचे दृश्य. (पीटीआय फोटो)
-
अयोध्येत दिवाळीच्या पूर्वसंध्येला शरयू नदीच्या काठावर दिवे लावण्यात येतात. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहराने शनिवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव सोहळ्यात २.२ दशलक्ष मातीच्या तेलाचे दिवे प्रज्वलित करून विक्रम प्रस्थापित केला, असे राज्य पर्यटन विभागाने म्हटले आहे. (एपी फोटो/राजेश कुमार सिंग)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ