चेन्नई आणि तामिळनाडू पूरग्रस्तांना सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये टॉलीवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांनी मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीद्वारे १० लाखांची मदत केली आहे. रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष याने पाच लाखांची मदत केली आहे. सिंगम चित्रपटातील अभिनेता सुरिया याने २५ लाखांची मदत केली आहे. -
अल्लू अर्जुनने २५ लाखांची मदत केली असून त्याने ट्विट केले की, माझ्या आयुष्यातील १८ वर्षे मी इथे घालवली आहे. आज मी जे काही आहे ते यांच्यामुळेच आहे. आय लव्ह यू चेन्नई.
तेलगु सुपरस्टार महेश बाबूने १० लाखांची मदत केली आहे. ज्युनियर एनटीआरने मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीद्वारे १० लाखांची मदत केली आहे. रवी तेजाने पाच लाखांची मदत केली आहे. कल्यान्रमने पाच लाखांची मदत केली आहे. वरुण तेजने तीन लाखांची मदत केली आहे.

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”