अमेरिकेच्या राजस्व विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. अमेरिकेतील राजस्व विभागात दहशतवाद आणि आर्थिक गुप्त विभागात कार्यरत असलेले उपसचिव अॅडम सजुबिन यांनी पुतिन यांच्या गोपनीय मालमत्तेचा तपास करण्याची मागणी कली आहे. अमेरिकेतील अधिकारी आणि रशियन नेत्यांकडील कागदपत्रांचा हवाला देत माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पुतिन यांच्या प्रायव्हेट जेटची किंमत कोटींच्या घरात असून, त्यात लाखो रुपयाचे टॉयलेट बांधण्यात आले आहे. -
ब्लादिमिर पुतिन ज्या प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करतात त्यातील बाथरूम सोन्याने मढवलेले आहे. या टॉयलेटची किंमत अंदाजे ४९ लाख इतकी वर्तवली जाते. (पुतिन यांच्या टॉयलेटची छायाचित्रे इंटरनेटवर लीक झाली होती.)
पुतिन जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा रोमन एब्रामोविच नावाच्या रशियन व्यावसायिकाने कोट्यावधी रुपये किंमतीची यॉट त्यांना भेट म्हणून दिल्याची माहिती अमेरिकी अधिकाऱ्याचा हवाला देत बीबीसीने प्रसिद्ध केली आहे. -
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कोट्यावधी रुपये किंमतीचे प्रायव्हेट जेट आहे.
-
ब्लादिमिर पुतिन यांच्या प्रायव्हेट जेटमधील दिमाखदार शयनगृहाचे (बेडरूम) छायाचित्र.
-
पुतिन यांना व्यायामाची आवड असल्याने विमानात खास त्यांच्यासाठी जिम तयार करण्यात आली आहे.
पुतिन यांची एकूण धनसंपदा अब्जावधी रूपयांची असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. पुतिन यांचा दरमहा पगार सत्याहत्तर लाख रुपये इतका आहे. बऱ्याच काळापासून पुतिन यांची धनसंपदा हा चर्चेचा विषय राहिला आहे. -
पुतिन यांच्याकडे ५८ विमानं आणि हेलिकॉप्टर असून ते २० महालांमध्ये वास्तव्य करत असल्याचे त्यांच्या एका राजनैतिक विरोधकाने म्हटलं आहे.
-
ब्लॅक सीच्या तिरावर पुतिन यांचा कोट्यावधी रुपये किंमतीचा अलिशान महाल असल्याचा दावा अमेरिकन अधिकारी अॅडम सजुबिन यांनी केला आहे. याशिवाय रशियाच्या पश्चिमी भागातील वाल्दाई तलावापाशी जवळजवळ २३०० एकरात त्यांचे एक घर आहे.

पदरात पडेल सुख ते हितशत्रूंपासून रहा सावध; प्रदोष व्रताबरोबर अनंग त्रयोदशीचा योगायोग तुमच्या आयुष्यात भरणार का नवे रंग? वाचा राशिभविष्य