-
भारताला १४५ 'एम७७७ होवित्झर' तोफा देण्याला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात काही तोफा भारताला थेट देण्यात येतील. त्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत भारतामध्येच या तोफा तयार करण्यात येतील.
-
'एम७७७ होवित्झर' या तोफा वजनाला हलक्या असून त्या बनविण्यासाठी टायटेनियमचा वापर करण्यात आला आहे. या तोफांच्या सहाय्याने २५ किलोमीटवर अंतरावर अचूक लक्ष्यभेद करता येऊ शकतो.
-
सीमेवरील चीनच्या वाढत्या दादागिरीवर वचक ठेवण्यासाठी भारतीय लष्कराला या तोफांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सुरूवातीला या तोफा लष्कराच्या १७ माऊंटन कॉर्प्समध्ये तैनात केल्या जाण्याची शक्यता आहे.
-
याशिवाय, भारत सध्या बोफोर्स तोफेची धनुष ही आधुनिक आवृत्ती तयार करत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाची किंमत १२६० कोटी इतकी आहे.
-
एम७७७ होवित्झर' तोफांची जोडणी करण्यासाठी भारतातील महिंद्र उद्योग समुहाची निवड करण्यात आली आहे.
१४५ तोफांची जोडणी आणि परिक्षण करण्यासाठीचा प्रकल्प महिंद्र सुरू करणार असल्याचे 'बीएई'ने एका निवेदनाद्वारे जाहीर केले. -
'बीएई' ही बहुराष्ट्रीय कंपनी अमेरिकेत या तोफांची निर्मिती करते. भारत आणि अमेरिकेदरम्यान १४५ 'एम७७७ होवित्झिर' तोफा खरेदी करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आपल्या युद्ध सामग्रीच्या माऱ्याची क्षमता उत्तम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारताने ७० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचा हा करार केला आहे.
-
भारताला १४५ 'एम७७७ होवित्झर' तोफा देण्याला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात काही तोफा भारताला थेट देण्यात येतील. त्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत भारतामध्येच या तोफा तयार करण्यात येतील.
-
सीमेवरील चीनच्या वाढत्या दादागिरीवर वचक ठेवण्यासाठी भारतीय लष्कराला या तोफांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सुरूवातीला या तोफा लष्कराच्या १७ माऊंटन कॉर्प्समध्ये तैनात केल्या जाण्याची शक्यता आहे.
-
याशिवाय, भारत सध्या बोफोर्स तोफेची धनुष ही आधुनिक आवृत्ती तयार करत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पाची किंमत १२६० कोटी इतकी आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”