-
गुरुवारी सकाळी संजय दत्तची येरवडा कारागृहातून सुटका करण्यात येणार आहे. त्या आनंदामुळे दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये ‘चिकन संजूबाबा’ ही डीश ग्राहकांना मोफत देण्यात येणार आहे. संजय दत्तच्या सुटकेच्या आनंदामुळे हॉटेलच्या मालकाने हा निर्णय घेतला आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
संजय दत्तच्या सुटकेचा आनंद व्यक्त करण्यासाठी दक्षिण मुंबईतील नूर मोहम्मदी हॉटेलमध्ये चिकन संजूबाबा ही डीश ग्राहकांना मोफत देण्यात येणार आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
संजय दत्त यानेच या हॉटेलचे १९८६ मध्ये उदघाटन केले होते. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
संजूबाबावरील प्रेमामुळेच हॉटेलचे मालक खालिद हाकीम यांनी चिकन डीश मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
संजय दत्तने अनेकदा या हॉटेलला भेट दिली आहे. येथील चिकन डीश त्याची फेव्हरेट राहिली आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
या हॉटेलमध्ये मिळणारी नल्ली नारी डीश संजय दत्तच्या अधिक आवडीची आहे. व्हाईट चिकन बिर्याणीही त्याला जास्त आवडते, असे हॉटेलच्या मालकांनी सांगितले. (छाया- अमय चक्रवर्ती)
-
संजयग्रेव्हीची चिकन डीश तयार केली होती. त्याच डिशला आम्ही चिकन संजूबाबा असे नाव दिले होते, असेही हॉटेलच्या मालकांनी यावेळी सांगितले. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अवैधपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेचा कालावधी कारागृहातील नियमांनुसार पूर्ण केल्यामुळे त्याची येत्या २५ फेब्रुवारीला, गुरुवारी सुटका करण्यात येणार आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)
Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश